सार

हिवाळ्याच्या दिवसात बहुतांशजणांना वाफाळलेला चहा-कॉफी पिणे आवडते. पण तुम्हाला काहीतरी हटके ट्राय करायचे असल्यास तुम्ही घरच्याघरी रेस्टॉरंटसारखी बबल टी तयार करू शकता.

Bubble Tea Recipe :  'बबल टी'ला 'बोबा टी' (Boba Tea) नावाने ओखळले जाते. बबल टी ताइवानमधील एक प्रसिद्ध ड्रिंक आहे. बबल टी वर्ष 1980 मध्ये अधिक चर्चेत आली. खरंतर ‘बबल टी’ टॅपिओका पर्ल (Tapioca Perl) पासून तयार केली जाते. बबल टी तुम्हाला ब्लॅक टी, ग्रीन टी सोबत काही फ्लेवर्समध्ये मिळते. पाहूयात घरच्याघरी बबल टी तयार करण्याची रेसिपी सविस्तर....

सामग्री

  • दीड कप काळ्या रंगातील ड्राय टॅपिओका पर्ल
  • एक कप पाणी
  • एक चतुर्थांश कप ब्राउन शुगर
  • एक कप घट्ट दूध
  • दोन चमचे चहा पावडर
  • बर्फाचे तुकडे

कृती

  • सर्वप्रथम टॅपिओका पर्ल 20-30 मिनिटे गरम पाण्यात उकळवा. टॅपिओका पर्ल उकळल्यानंतर ते  गाळीने गाळून एका दुसऱ्या भांड्यात थंड होण्यासाठी काढून ठेवा.
  • पॅन गॅसवर मंद आचेवर ठेवून त्यामध्ये ब्राउन शुगर टाकत त्यामध्ये दोन चमचे पाणी मिक्स करा. ब्राउन शुगरचा पाक तयार झाल्यानंतर टॅपिओका पर्ल त्यामध्ये मिक्स करा. यामुळे पर्लला गोड चव येईल.

    चहा बनवण्यासाठी कृती
  • एक कप पाण्यामध्ये चहा पावडर मिक्स करून तीन ते पाच मिनिटे उकळवा. यामध्ये साखर आणि दूधही मिक्स करून पुन्हा सर्व सामग्री व्यवस्थितीत उकळण्यासाठी ठेवा. चहा तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • चहा थंड झाल्यानंतर एका ग्लासमध्ये बर्फाचे तीन-चार तुकडे टाका. आता ग्लासमध्ये चहा टाकत टॅपिओका पर्लही त्यात मिक्स करा. अशाप्रकारे तयार होईल तुमची बबल टी. संध्याकाळच्या स्नॅक टाइमला तुम्ही बबल टी पिण्याचा आनंद घेऊ शकता.

हेल्दी बबल टी अशी तयार करा

तुम्हाला हेल्दी बबल टी तयार करायची असल्यास साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा, चहा उकळवताना त्यामध्ये मध मिक्स करू नका. याशिवाय टॅपिओका पर्ल हे मधात मिक्स करू शकता. डेअरी दूधाऐवजी बदाम किंवा सोयाबीनच्या दूधाचा वापर करू शकता.

VIDEO : बबल टी घरच्याघरी बनवण्याच्या रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा…

View post on Instagram
 

Video Credits : brendan_pang

आणखी वाचा : 

संध्याकाळच्या नाश्तासाठी घरच्याघरी बनवा या 7 प्रकारचे Veg Kabab

Orange Chicken Recipe : आंबट-तिखट चव असणाऱ्या ऑरेंज चिकनची रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप

सोशल मीडियात व्हायरल होतोय Puni Puri Juiceचा व्हिडीओ, नेटकऱ्यांनी म्हटले..…