तुमच्या RO प्युरिफायरच्या सर्व्हिसिंगसाठी प्रत्येक वेळी टेक्निशियनला बोलवणं खरंच गरजेचं आहे का? घरच्या घरी RO ची बेसिक साफसफाई कशी करायची? RO ची टाकी आणि फिल्टर स्वच्छ करण्याची सोपी पद्धत कोणती? चला, जाणून घेऊया.

RO Water Purifier Cleaning Guide: आजकाल बहुतेक घरांमध्ये शुद्ध आणि आरोग्यदायी पाण्यासाठी RO वॉटर प्युरिफायर वापरला जातो. पण जर याची नियमित साफसफाई केली नाही, तर मशीनची कार्यक्षमता कमी होते आणि पाण्याची क्वालिटीसुद्धा खराब होऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे, RO प्युरिफायरची बेसिक सर्व्हिस आणि साफसफाई तुम्ही घरच्या घरीच करू शकता. यासाठी प्रत्येक वेळी टेक्निशियन किंवा प्लंबरला बोलवण्याची गरज नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कशी करायची RO वॉटर प्युरिफायरची सफाई?

सर्वात आधी वीज आणि पाणीपुरवठा बंद करा

तुमच्या RO प्युरिफायरची साफसफाई सुरू करण्यापूर्वी, त्याचा पॉवर प्लग काढून टाका आणि घरात येणारा पाण्याचा सप्लाय बंद करा. यामुळे साफसफाई करताना कोणतीही अडचण येणार नाही.

बाहेरून बॉडी स्वच्छ करा

एक मऊ कापड सौम्य साबणाच्या पाण्यात भिजवून RO ची बाहेरील बॉडी चांगली पुसून घ्या. डिस्प्ले, टच पॅनल आणि इलेक्ट्रिक भागांवर जास्त पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. हे भाग फक्त कोरड्या किंवा हलक्या ओल्या कापडानेच स्वच्छ करा.

स्टोरेज टँकची सफाई करा

RO टँकमधील सर्व पाणी काढून टाका. जर तुमच्या मॉडेलमध्ये टँक सहजपणे उघडत असेल, तर तो काढून साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा. गरज वाटल्यास तुम्ही फूड-ग्रेड सॅनिटायझरचा वापरही करू शकता. साफसफाईनंतर टँक पाण्याने चांगला धुवा आणि पुन्हा व्यवस्थित बसवा.

RO चा नळ स्वच्छ करा

RO च्या नळाला ओल्या कापडाने पुसून घ्या. नळाच्या तोंडाशी जमलेली घाण किंवा क्षार (scaling) एका लहान ब्रशच्या मदतीने काढून टाका.

प्री-फिल्टर तपासा

जर प्री-फिल्टरमध्ये माती, गाळ किंवा घाण जमा झाली असेल, तर तो बदलणेच योग्य ठरते. साधारणपणे, सेडिमेंट फिल्टर आणि कार्बन फिल्टर दर 6 ते 12 महिन्यांनी एकदा बदलावेत.

सफाईनंतर फ्लशिंग करा

संपूर्ण साफसफाई झाल्यावर पाण्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा. टँक पूर्ण भरू द्या आणि त्यानंतर 1 ते 2 वेळा तो रिकामा करा. यानंतरच पिण्यासाठी पाणी वापरा.

RO मेम्ब्रेन आणि फिल्टर घरी स्वच्छ करता येतात का?

साधारणपणे, RO मेम्ब्रेन, सेडिमेंट फिल्टर, कार्बन फिल्टर आणि UV युनिटची अंतर्गत साफसफाई घरी केली जात नाही. हे भाग वेळोवेळी बदलणेच योग्य मानले जाते. मात्र, अनेक मॉडेल्समध्ये तुम्ही फिल्टर स्वतः बदलू शकता. यासाठी मशीन उघडण्यापूर्वी त्याचे युझर मॅन्युअल नक्की वाचा.

सर्वात जास्त सर्च होणारे प्रश्न

1. RO प्युरिफायरची सफाई किती दिवसांनी करावी?

RO ची बाहेरील साफसफाई दर महिन्याला आणि फिल्टरची तपासणी दर 6 ते 12 महिन्यांनी करावी.

2. RO ची टाकी घरी स्वच्छ करता येते का?

हो, बहुतेक मॉडेल्समध्ये टाकी काढून साबणाच्या पाण्याने स्वच्छ करता येते.

3. RO मेम्ब्रेन धुवून पुन्हा वापरता येतो का?

नाही, साधारणपणे RO मेम्ब्रेन स्वच्छ करण्याऐवजी त्याची वेळ झाल्यावर तो बदलणेच चांगले असते.