Orange Chicken Recipe : आंबट-तिखट चव असणाऱ्या ऑरेंज चिकनची रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप

| Published : Jan 04 2024, 06:23 PM IST / Updated: Jan 04 2024, 06:28 PM IST

Orange Chicken
Orange Chicken Recipe : आंबट-तिखट चव असणाऱ्या ऑरेंज चिकनची रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चिकनच्या रेसिपी टेस्ट केल्या असतील. कधी इंडो-वेस्टर्न तर कधी पारंपारिक पद्धतीची चिकनची रेसिपी आपण खातोच. पण तुम्ही ऑरेंज चिकनची रेसिपी घरी ट्राय केली आहे का?

Orange Chicken Recipe : तुम्हाला चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात का? आज आपण ऑरेंज चिकनची रेसिपी पाहाणार आहोत. खरंतर ऑरेंज चिकन ही एक चीनी-अमेरिकन रेसिपी आहे. या रेसिपीमधील कुरकुरीत चिकनला आंबट-तिखट चव असते. जाणून घेऊया याची रेसिपी स्टेप बाय स्टेप....

सामग्री

 • अर्धा किलो बोनलेस चिकन
 • एक कप कॉर्नस्टार्च
 • एक अंड
 • मीठ चवीनुसार
 • काळी मिरी
 • तेल

सॉस तयार करण्यासाठी सामग्री

 • एक कप संत्र्याचा ज्युस
 • संत्र्याची साल
 • एक तृतीयांश चमचा सोया सॉस
 • एक चतृतांश चमचा व्हिनेगर
 • एक चमचा बारीक चिरलेले आलं
 • एक चमचा बारीक चिरलेली लसूण
 • एक तृतीयांश चमचा ब्राउन शुगर
 • एक मोठा चमचा कॉर्नस्टार्च
 • कांद्याची पात
 • तीळ

कृती

 • सर्वप्रथम एका भांड्यात बोनलेस चिकन घेऊन त्यावर मीठ आणि काळी मिरीची पूड टाका. आता कॉर्नस्टार्चमध्ये अंड आणि थोडं पाणी मिक्स करून बॅटर तयार करून ते चिकनमध्ये मिक्स करा.
 • चिकन व्यवस्थितीत मॅरिनेट झाल्यानंतर गॅसवर पॅन चढवून त्यामध्ये तेल गरम करा. आता तेलामध्ये मॅरिनेट केलेले चिकन तपकिरी रंगाचे होई पर्यंत तळून घ्या. चिकन तळून झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात ते काढून ठेवा.
 • सॉस तयार करण्यासाठी, पॅन गॅसवर मंद आचेवर ठेवून त्यामध्ये संत्र्याचा ज्युस, संत्र्याची साल, सोया सॉस, व्हिनेगर, ब्राउन शुगर, आलं, लसूण मिक्स करा. सर्व गोष्टी उकळल्यानंतर त्यामध्ये कॉर्नस्टार्च मिक्स करा.
 • सॉस घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये तळलेले चिकन व्यवस्थितीत मिक्स करा. ऑरेंज चिकन तयार झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून त्यावरून चिरलेली कांद्याची पात आणि तिळाने रेसिपीला सजवा.

आणखी वाचा : 

सांबार आणि रसम मधील हा आहे फरक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Moong Dal Dosa : मुलांना नाश्तासाठी बनवा चविष्ट असा मूग डाळीचा डोसा

Cauliflower Manchurian Recipe : घरच्याघरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट फ्लॉवर मंच्युरिअन