MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Uric Acid Diet : युरिक ॲसिडचा त्रास आहे? मग या 7 पदार्थांपासून लांबच राहा

Uric Acid Diet : युरिक ॲसिडचा त्रास आहे? मग या 7 पदार्थांपासून लांबच राहा

आपल्या शरीरातील पेशी आणि काही विशिष्ट पदार्थांमध्ये 'प्युरीन्स' नावाचे घटक असतात. हे प्युरीन्स तुटल्यावर शरीरात जो टाकाऊ पदार्थ तयार होतो, त्यालाच युरिक ॲसिड म्हणतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 12 2026, 07:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
युरिक ॲसिड
Image Credit : Getty

युरिक ॲसिड

आपल्या शरीरातील पेशी आणि काही पदार्थांमध्ये 'प्युरीन्स' असतात. हे प्युरीन्स तुटल्यावर युरिक ॲसिड तयार होते. सामान्यतः, हे युरिक ॲसिड रक्तात मिसळते आणि किडनीद्वारे लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
युरिक ॲसिडमुळे सांध्यांना सूज
Image Credit : Getty

युरिक ॲसिडमुळे सांध्यांना सूज

शरीरात युरिक ॲसिड जास्त तयार झाले किंवा ते व्यवस्थित बाहेर पडले नाही, तर सांध्यांमध्ये त्याचे खडे जमा होतात. यामुळे सांध्यांना सूज येते आणि भयंकर वेदना होतात. ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे, त्यांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Related Articles

Related image1
Vitamin D Deficiency : शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका
Related image2
Flax Seeds Benefits : भिजवलेले जवस खाण्याचे 6 भन्नाट फायदे
39
रेड मीड खाऊ नये
Image Credit : Getty

रेड मीड खाऊ नये

युरिक ॲसिडचा त्रास असलेल्यांनी रेड मीट अजिबात खाऊ नये. रेड मीटमध्ये 'प्युरीन्स'चे प्रमाण खूप जास्त असते. हे प्युरीन्स शरीरात गेल्यावर युरिक ॲसिडमध्ये बदलतात आणि रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वेगाने वाढवतात.

49
प्युरीन्स भरपूर असलेले सीफूड
Image Credit : X

प्युरीन्स भरपूर असलेले सीफूड

मत्स्यप्रेमींनी काळजी घेणे आवश्यक आहे. सार्डिन, अँकोव्हीज, मॅकरेल, शिंपले आणि डबाबंद ट्यूना मासे खाणे टाळा. या सीफूडमध्ये प्युरीन्स भरपूर असतात. यामुळे हायपरयुरिसेमियाचा धोका वाढतो आणि सांधेदुखीचा त्रास बळावतो.

59
हाय फ्रक्टोज सिरप
Image Credit : Getty

हाय फ्रक्टोज सिरप

गोड पेये प्यायल्याने रक्तातील युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते. विशेषतः हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप असलेल्या पेयांमुळे गाउटचा (gout) धोका वाढतो. त्यामुळे सोडा, एनर्जी ड्रिंक्स, कृत्रिम ज्यूस आणि साखर घातलेली पेये पूर्णपणे बंद करा.

69
मद्यपान
Image Credit : AI Image

मद्यपान

मद्यपानामुळे रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढते. यामुळे गाउटचा (gout) झटका येण्याची आणि सांधेदुखी वाढण्याची शक्यता अमदसते. विशेषतः बिअरमध्ये प्युरीन्सचे प्रमाण जास्त असते, ज्याचे रूपांतर शरीर युरिक ॲसिडमध्ये करते.

79
फास्ट फूड
Image Credit : Getty

फास्ट फूड

फास्ट फूडमध्ये शरीराला घातक असणारे फॅट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, सोडियम आणि लपलेली साखर असते. त्यामुळे बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, फ्राईड चिकन आणि इन्स्टंट नूडल्स खाणे टाळा.

89
गोड पदार्थ
Image Credit : Getty

गोड पदार्थ

गोड पदार्थ अप्रत्यक्षपणे युरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे केक, कुकीज, पेस्ट्री, कँडीज, आईस्क्रीम आणि डोनट्स यांसारखे पदार्थ आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. हे पदार्थ खाणे टाळलेलेच बरे.

99
प्रोसेस्ड मीट
Image Credit : magnific

प्रोसेस्ड मीट

प्रोसेस्ड मीट खाल्ल्याने युरिक ॲसिडची पातळी लक्षणीयरीत्या वाढते आणि गाउटचा (gout) धोका निर्माण होतो. हे मांस शरीरात तुटून त्याचे युरिक ॲसिडमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे हायपरयुरिसेमियाचा त्रास सुरू होतो.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Jewellery : सिल्क साडीवर घाला हे दागिने, सगळे पाहतच राहतील
Recommended image2
Gold Haram Designs : 4 तोळ्यांत मिळणाऱ्या सोन्याच्या हारांच्या डिझाईन्स पाहा
Recommended image3
Festival Happiness : सण जवळ आले की आपल्याला इतका आनंद का होतो? यामागचं सिक्रेट माहितीये?
Recommended image4
Flax Seeds Benefits : भिजवलेले जवस खाण्याचे 6 भन्नाट फायदे
Recommended image5
Lightweight Sarees : स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी बेस्ट साडी डिझाईन्स
Related Stories
Recommended image1
Vitamin D Deficiency : शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका
Recommended image2
Flax Seeds Benefits : भिजवलेले जवस खाण्याचे 6 भन्नाट फायदे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved