MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Festival Happiness : सण जवळ आले की आपल्याला इतका आनंद का होतो? यामागचं सिक्रेट माहितीये?

Festival Happiness : सण जवळ आले की आपल्याला इतका आनंद का होतो? यामागचं सिक्रेट माहितीये?

सणांचे दिवस जवळ आले की आपल्या मनात एक वेगळाच उत्साह आणि आनंद संचारतो, हे तुम्ही कधी नोटीस केलंय का? पण असं नेमकं का होतं, याचा कधी विचार केलाय? आपला मेंदू, आपल्या भावना आणि सणांचं वातावरण यांचं एक खास कनेक्शन आहे. यामागचं नेमकं कारण समजून घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 12 2026, 05:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सणांचा सीझन सुरू होताच मन इतकं आनंदी का होतं?
Image Credit : Asianet News

सणांचा सीझन सुरू होताच मन इतकं आनंदी का होतं?

सण जवळ आले की आपलं मन आपोआप आनंदाने आणि उत्साहाने भरून जातं. पण सणांचे दिवस जवळ येताच आपला मेंदू इतका खुश का होतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय? आपला मेंदू, आपल्या भावना आणि आपली सामाजिक नाती यांचं खूप जवळचं कनेक्शन असतं. आपण सहसा या गोष्टीकडे लक्ष देत नाही. सणांचा सीझन सुरू होताच आपलं मन नेमकं का आनंदी होतं?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
डोपामाईन (Dopamine)
Image Credit : Asianet News

डोपामाईन (Dopamine)

सणांच्या काळात आपण शॉपिंग करतो, घर सजवतो आणि एकमेकांना गिफ्ट्स देतो. या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूला प्रचंड आनंद देतात. या ॲक्टिव्हिटीजमुळे मेंदूतील 'रिवॉर्ड मेकॅनिझम' ॲक्टिव्ह होतं. यामुळे डोपामाईन रिलीज होण्याची प्रक्रिया वाढते. डोपामाईन हे मेंदूतील एक केमिकल मेसेंजर आहे, जे आपल्याला प्रेरणा, अपेक्षा आणि आनंदाची जाणीव करून देतं.

Related Articles

Related image1
Money Psychology : पैसा माणसाचा विचार कसा बदलतो? सायकॉलॉजी काय सांगते ते पाहा
36
सामाजिक नाती (Social Connection)
Image Credit : Asianet News

सामाजिक नाती (Social Connection)

सण म्हणजे आपले कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या माणसांना भेटण्याची एक खास वेळ असते. त्यांच्याकडून आपल्याला प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळेल, अशी आपली अपेक्षा असते. अशी नाती आपला ताणतणाव दूर करतात आणि आपल्याला आनंदी राहायला मदत करतात. यामुळे आपलं भावनिक आरोग्यही सुधारतं.

46
भावनिक आठवणी (Emotional Memory)
Image Credit : chatgpt

भावनिक आठवणी (Emotional Memory)

सणांची गाणी, आजूबाजूचा सुगंध, सजावट, पारंपारिक पदार्थ आणि बालपणाशी जोडलेल्या अनेक गोष्टी आपल्याला सणांच्या काळात पुन्हा आठवतात. या गोष्टी आपल्याला जुन्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देतात. यामुळे आपल्या मनात एक अतिशय सुखद आणि प्रसन्न भावना निर्माण होते.

56
रोजच्या रुटीनमधून ब्रेक (Break from Routine)
Image Credit : Gemini

रोजच्या रुटीनमधून ब्रेक (Break from Routine)

सणांचा सीझन आपल्याला रोजच्या कंटाळवाण्या रुटीनमधून थोडा ब्रेक घेण्याची संधी देतो. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आराम मिळतो. हा बदल जरी थोड्या काळासाठी असला, तरी तो आपला ताणतणाव कमी करतो. यामुळे आपलं मन एकदम फ्रेश आणि उत्साही राहतं.

66
प्रत्येकासाठी सणाचा आनंद सारखा नसतो
Image Credit : Getty

प्रत्येकासाठी सणाचा आनंद सारखा नसतो

इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, सणांच्या काळात प्रत्येकाला सारखाच आनंद मिळतो असं नाही. प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. आर्थिक अडचणी, एकटेपणा आणि वाढलेल्या अपेक्षा यामुळे कधीकधी सणांचा आनंद घेता येत नाही. अशा वेळी आनंदाऐवजी ताणतणाव, दुःख किंवा नैराश्य येऊ शकतं. परिस्थिती काहीही असो, प्रत्येकाने आपल्या भावनिक आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Flax Seeds Benefits : भिजवलेले जवस खाण्याचे 6 भन्नाट फायदे
Recommended image2
Lightweight Sarees : स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी बेस्ट साडी डिझाईन्स
Recommended image3
Bangles Set : पाहताक्षणी प्रेमात पाडणारं अँटिक बांगड्यांचं कलेक्शन
Recommended image4
Bread Pakora Recipe : शिळ्या ब्रेडपासून १० मिनिटांत बनवा कुरकुरीत ब्रेड पकोडे, रोज बनवाल!
Recommended image5
Navratri 2026 : गरबा नाईटला जाताय? या १० गोष्टींशिवाय घराबाहेर पडू नका!
Related Stories
Recommended image1
Money Psychology : पैसा माणसाचा विचार कसा बदलतो? सायकॉलॉजी काय सांगते ते पाहा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved