- Home
- lifestyle
- Vitamin D Deficiency : शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका
Vitamin D Deficiency : शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका
भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. आपण भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या देशात राहतो, तरीही एका अभ्यासानुसार ८० टक्क्यांहून अधिक भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते.

व्हिटॅमिन डी ची कमतरता
भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आपण भरपूर ऊन असलेल्या वातावरणात राहतो, तरीही ८० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांना या समस्येचा सामना करावा लागतो, असं अभ्यास सांगतो.

व्हिटॅमिन डी बजावते महत्त्वाची भूमिका
सतत घरात राहण्याची सवय, सनस्क्रीनचा जास्त वापर, अतिनील (UVB) किरणं रोखणारं प्रदूषण आणि अंगभर कपडे घालणं यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी कमी होतं. कॅल्शियम शोषून घेणं, हाडांची ताकद, रोगप्रतिकारक शक्ती आणि मूड चांगला ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं.
याकडे दुर्लक्ष करू नका
व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे हाडं कमकुवत होतात, थकवा येतो, स्नायूंमध्ये वेदना होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास लहान मुलांमध्ये 'रिकेट्स' आणि प्रौढांमध्ये 'ऑस्टिओमलेशिया' सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
अंगदुखी, अशक्तपणा महत्त्वाचं लक्षण
सतत थकवा आणि ऊर्जेची कमतरता हे याचं पहिलं लक्षण आहे. तुम्ही पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा किंवा सुस्तपणा जाणवत असेल, तर हे शरीरात व्हिटॅमिन डी कमी असल्याचं लक्षण आहे. यामुळे अंगदुखी आणि स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो.
व्हिटॅमिन डी
हाडं आणि पाठ दुखणं हे याचं दुसरं मुख्य लक्षण आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घ्यायला मदत करतं. याची पातळी कमी झाल्यावर हाडांमध्ये, विशेषतः कंबर, नितंब आणि बरगड्यांमध्ये खूप वेदना होऊ शकतात.
हाता-पायांना मुंग्या
स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि वेदना हे तिसरं लक्षण आहे. व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे स्नायूंच्या कामावर परिणाम होतो. यामुळे विशेषतः पायांमध्ये अशक्तपणा येतो, क्रॅम्प्स येतात किंवा जिने चढताना त्रास होतो. रक्तातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे तोंड किंवा हात-पायांना मुंग्या येऊ शकतात.
इन्फेक्शनची समस्या
तुम्ही वारंवार आजारी पडत असाल किंवा इन्फेक्शन होत असेल, तर हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतं. हे कमी झाल्यामुळे शरीर व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढू शकत नाही, ज्यामुळे सर्दी किंवा श्वसनाचे आजार लवकर होतात.
डिप्रेशनची लक्षण दिसू शकतात
सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे डिप्रेशन आणि चिडचिड वाढते, ज्याचा थेट संबंध व्हिटॅमिन डी च्या कमतरतेशी असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्यास डिप्रेशनची लक्षणं कमी व्हायला मदत होऊ शकते.

