Romantic Valentine’s Day & Valentine Week 2026 Wishes, Quotes & Messages in Marathi: व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन वीकच्या दिवशी 75+ रोमँटिक शुभेच्छा, मेसेज, SMS, कोट्स आणि WhatsApp स्टेटस पाठवून आपल्या प्रियजनांना आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करा.
50+ Valentine’s Day & Week Wishes in Marathi : व्हेलेंटाइन वीक म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा, नात्यांमध्ये गोडवा भरण्याचा आणि मनातल्या भावना शब्दांत मांडण्याचा खास काळ रोजच्या धावपळीत अनेकदा न बोलता राहिलेलं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा या आठवड्यात एका सुंदर मेसेजमधून व्यक्त करता येतो. प्रियकर-प्रेयसी असो किंवा नवरा-बायको, आपल्या खास व्यक्तीसाठी पाठवलेला एक साधा पण मनापासून लिहिलेला मेसेज नात्याला अधिक घट्ट करू शकतो आणि या व्हेलेंटाइन वीकला कायम लक्षात राहणारा बनवू शकतो.
गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, पति-पत्नी आणि प्रियजणांसाठी हार्टफेल्ट कोट्स, मेसेज आणि इमेजेस
- तू माझ्या आयुष्यात आलास/आलीस आणि प्रत्येक दिवस खास बनला
- तुझ्या एका स्मितासाठी मी हजारो स्वप्नं पाहू शकतो/शकते
- माझ्या प्रत्येक आनंदामागचं कारण म्हणजे तू
- तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटतं
- तुझ्या प्रेमात पडणं हा माझा आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय आहे
- तू सोबत असलास/असलीस की जग जिंकल्यासारखं वाटतं
- माझ्या प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे
- तुझ्या डोळ्यांत पाहिलं की वेळ थांबते
- माझं हसणं, रडणं, स्वप्नं सगळं काही तुझ्यामुळे आहे
- प्रेम म्हणजे काय, हे मला तुझ्यामुळेच कळलं
- तू फक्त माझा/माझी आहेस… एवढंच पुरेसं आहे
- माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे तू
- तुझ्या हातात हात घेतला की सगळ्या चिंता दूर जातात
- तू माझी सवय नाहीस, तू माझं प्रेम आहेस
- तुझ्यासोबत प्रत्येक दिवस व्हेलेंटाइन डे वाटतो

- माझ्या मनाचं घर फक्त तुझ्यासाठीच खुलं आहे
- तू जवळ असलास/असलीस की सगळं काही योग्य वाटतं
- तुझ्यावरचं प्रेम शब्दांत मांडणं अशक्य आहे
- तुझ्या एका मेसेजने माझा दिवस सुंदर होतो
- माझं हृदय तुझ्या नावावर कायमचं लिहिलं आहे
- तूच माझी सुरुवात आणि तूच शेवट आहेस
- तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय… एवढंच स्वप्न आहे
- तू माझं प्रेम आहेस, माझं जग आहेस
- तुझ्या आठवणीतही एक वेगळीच गोडी आहे
- माझ्या आयुष्यात तू आहेस, यासाठी मी कायम ऋणी आहे
- तुझ्यासोबतचं प्रत्येक नातं माझ्यासाठी खास आहे
- आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू सोबत आहेस, हेच माझं भाग्य
- तुझ्या प्रेमाने माझं आयुष्य सुंदर केलं
- तू माझा जोडीदार नाहीस, तू माझा आधार आहेस
- तुझ्याशिवाय घर घर वाटत नाही
- माझ्या प्रत्येक यशामागे तुझी साथ आहे
- तू आहेस म्हणूनच आयुष्य इतकं सोपं वाटतं
- लग्नानंतरचं प्रेम अधिक गहिरं असतं… तुझ्यामुळे
- तुझ्या हास्याने घरात आनंद भरतो
- आयुष्यभर तुझाच हात हातात हवा
हे देखील वाचा : Rose Day : व्हॅलेंटाईन वीकमधल पहिला दिवस रोझ डे का साजरा करतात? जाणून घ्या

- तू माझा जीवनसाथी नाहीस, तू माझं आयुष्य आहेस
- सुख-दुःखात तुझी साथ माझ्यासाठी अनमोल आहे
- रोज तुझ्यावर प्रेम वाढतंच जातं
- तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय हेच माझं स्वप्न आहे
- तू आहेस म्हणूनच आयुष्याला अर्थ आहे
- तुझ्या प्रेमाने मला पूर्ण केलं
- माझ्या प्रत्येक प्रार्थनेत तुझं नाव आहे
- तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे
- आयुष्याच्या या प्रवासात तूच माझी सोबत आहेस
- तुझ्यावरचं प्रेम शब्दांपलीकडचं आहे
- तू फक्त जोडीदार नाहीस, तू माझा मित्र/मैत्रीण आहेस
- तुझ्यासोबत प्रत्येक दिवस खास वाटतो
- आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहीन
- तू आहेस म्हणूनच मी शांत आहे
- माझं आयुष्य, माझं प्रेम, माझं सगळं काही तू आहेस
हे देखील वाचा : Valentine Day Gifts: व्हेलेंटाईन डेला ४९९ मध्ये द्या हे गिफ्ट्स, पर्याय घ्या जाणून


