सार
Chitra Navratri 2029 Upvas : चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात बहुतांशजण उपवास ठेवतात. अशातच उपवासावेळी शरीराला थकवा जाणवू नये म्हणून काही गोष्टींचे सेवन करू शकता.
Chitra Navratri 2029 Upvas : हिंदू धर्मात नवरात्रीचे महत्व आहे. यावेळी नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. याशिवाय नऊ दिवस बहुतांशजण उपवासही करतात. धार्मिक मान्यतेनुसार, नऊ दिवसांच्या उपवासाचे फार महत्व आहे. पण यावेळी काही गोष्टींची काळजी घ्यावी. खासकरुम महिलांनी उपवासावेळी थकवा येऊ नये म्हणून काही गोष्टींचे सेवन करू शकता.
फळ आणि ड्राय फ्रुट्स
नवरात्रीच्या नऊ दिवसात फळ आणि ड्राय फ्रुट्सचे उपवासावेळी सेवन करू शकता. यावेळी संत्र, केळ, पपई आणि कलिंगड अशा फळांचे सेवन करा. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल. एवढेच नव्हे ड्राय फ्रुट्समध्ये काजू, बदाम, अक्रोड खाऊ शकता.
साबुदाणा
नवरात्रीच्या उपवासावेळी आपल्या डाएटमध्ये साबुदाण्याचा समावेश करू शकता. साबुदाण्यामध्ये कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन आणि फायबर असतात. जे शरीराला उर्जा देतात. साबुदाण्यापासून खिचडी, वडा तायर करू शकता.
शिंगाड्याचे पीठ
शिंगाड्याचे पीठ उपवासावेळी खाऊ शकता. यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते. जे शरीराला उर्जा देण्यास मदत करतता. शिंगाड्यापासून पोळी, उपवासाचा पराठा तयार करू शकता.
दही आणि ताक
दहीआणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असल्याने हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दही आणि ताकाचे सेवन करू शकता.
पनीर
उपवासावेळी पनीरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे स्नायू मजबूत होतात. पनीरचे सेवन सॅलड, सूप किंवा उपवासासाठीच्या पदार्थासाठी करू शकता.
राजगीऱ्याचे पीठ
राजगीऱ्याच्या पीठाचे उपवासावेळी सेवन करू शकता. यामध्ये पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. राजगीऱ्याच्या पीठापासून पराठे, खिचडी तयार करू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)