चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला दाखवा या 9 पदार्थांचा नैवेद्य
Lifestyle Mar 27 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
चैत्र नवरात्री 2025
यंदा चैत्र नवरात्री येत्या 30 मार्चपासून सुरू होणार असून 6 एप्रिल पर्यंत असणार आहे.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा उपवास
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काहीजण उपवास ठेवतात. जाणून घेऊया देवीला नऊ दिवसात कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा पहिला दिवस
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहे. यावेळी देवीला तूप किंवा गोडाचा एखादा पदार्थ म्हणून नैवेद्य दाखवू शकता.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. यावेळी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवू शकता.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा तिसरा दिवस
तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाणार असून यावेळी दूध किंवा यापासून तयार करण्यात आलेला नैवेद्य दाखवावा.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा चौथा दिवस
चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाणार आहे. यावेळी मालपोह्याचा नैवेद्य दाखवू शकता.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा पाचवा दिवस
पंचमीला देवी स्कंदमातेची पूजा असणार आहे. देवीला केळ्यांचा नैवेद्य दाखवू शकता.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा सहावा दिवस
सहव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाणार आहे. यावेळी देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा.
Image credits: Getty
Marathi
नवरात्रीचा सातवा दिवस
सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा असून देवीला गुळ किंवा त्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
Image credits: adobe stock
Marathi
नवरात्रीचा आठवा दिवस
अष्टमीला देवी महागौरीची पूजा होणार आहे. यावेळी नारळाचा नैवेद्य देवीला दाखवावा.
Image credits: adobe stock
Marathi
नवरात्रीचा नववा दिवस
नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा करत तिला हलवा, चण्याचा नैवेद्य दाखवू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.