प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात नवरात्री साजरी केली जाते. यंदा नवरात्री 30 मार्चपासून सुरू होणार आहे. याबद्दल अनेक पारंपारिक प्रथा प्रचलित आहेत.
बहुतांशजण नवरात्रीवेळी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देतात. नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्ती जेवणात कांदा-लसूणचे सेवन करणे टाळतात.
धर्म ग्रंथांनुसार, कांदा-लसूण तामसिक भोजन असल्याचे मानले गेले आहे. म्हणजेच असे भोजन केल्याने मनात उत्तेजना आणि वाईट विचार येण्याची शक्यता असते.
नवरात्रीवेळी कांदा-लसूणचे सेवन न करण्यामागील कारण म्हणजे, उपवासाला सात्विक जेवण केले जाते. जेणेकरुन मन शांत राहिल.
अशी देखील मान्यता आहे की, ज्या भाज्या जमिनींमधून काढल्या जातात त्यामध्ये सूक्ष्म जीव असतात. यामुळे उपवासावेळी अशा भाज्यांचे सेवन टाळले जाते.