ओमानमधील मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 28 हून अधिक जखमी झाले आहेत. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. हल्ल्यावेळी धार्मिक कार्यक्रम चालू होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मार्केटमध्ये भारतात तयार केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत भारतीय प्रोडक्ट्सला जगभरात मिळणाऱ्या पसंतीबद्दल लिहिले आहे.
Ashadhi Akadashi 2024 : 17 जुलैला आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. या दिवशी विठुरायाच्या नामाचा गजर करत अनेक वारकरी, भाविक त्याच्या भक्तिरसात तल्लिन होतात. यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवून विठुरायाला वंदन करा.
NEET Paper Leak: नीट युजी प्रकरणात सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात सीबीआयने मंगळवारी (16 जुलै) दोन आरोपींना बिहार आणि झारखंड येथून ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत सीबीआयने पेपर लीक प्रकरणात संपूर्ण देशभरातून डझनभर व्यक्तींना ताब्यात घेतले होते.
IAS Puja Khedkar : महाराष्ट्रातील आयएएस पूजा खेडकरच्या विरोधात मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. पूजा खेडकरची तत्काळ रुपात ट्रेनिंग रद्द करण्यात आली असून मसूरी अॅकेडमीमध्ये परतण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.
Worli Hit and Run Case Update : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला मुंबईतील एका न्यायालयाने 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर हिट अँड रन प्रकरणात एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
Vicky Kaushal Bad Newz Movie : विक्की कौशलचा आगामी सिनेमा बॅड न्यूज येत्या शुक्रवारी (19 जुलै) रिलीज होणार आहे. याआधी सिनेमाचवर सेंसर बोर्डाने कैची चालवली आहे. सेंसर बोर्डाकडून सिनेमातील 27 सेकंदाच्या सीनमध्ये बदल करण्यास सांगितला आहे.
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अपंगत्व आणि आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, यासाठी त्यांनी दोनदा अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
डोंबिवली येथील योगेश ठोंबरे आणि त्यांची आई नीरा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये योगेश आईच्या पाया पडताना दिसतो. या व्हिडीओत योगेश आपल्या यशाचे श्रेय आईला देतो.
Katrina Kaif Beauty Secret: बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होते. अशातच कतरिनाचे ब्युटी सिक्रेट काय हे प्रत्येकालाच जाणून घेण्यास उत्सुक आहे. जाणून घेऊया कतरिना कैफ सौंदर्य खुलवण्यासाठी कोणते फेसपॅक वापरते याबद्दल अधिक...