Video : ट्रॅफिकमध्ये UPSC परीक्षेचा व्हिडीओ पाहणारा झोमॅटो बॉय झाला व्हायरल, इंटरनेटवर होत आहे कौतुक

| Published : Mar 31 2024, 12:12 PM IST / Updated: Mar 31 2024, 12:13 PM IST

zomato boy

सार

ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या झोमॅटो डिलिव्हरी एजेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो एजंट युपीएससी संदर्भातील व्हिडीओ पाहत असल्याचे दिसून आले आहे.

ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या झोमॅटो डिलिव्हरी एजेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो एजंट युपीएससी संदर्भातील व्हिडीओ पाहत असल्याचे दिसून आले आहे. 29 मार्च रोजी X वर आयुष संघी या वापरकर्त्याने शेअर केलेली क्लिपमध्ये झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह गोंधळलेल्या वातावरणात त्याच्या UPSC व्हिडीओ पाहताना दिसून आला. 

यामध्ये एक्स प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “सपने, मजबुरी और समय की तंगी”  आपण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी देणारा डिलिव्हरी बॉय किती संघर्ष करत आहे, हे दिसून येत आहे. यामध्ये कॅप्शनमध्ये युझरने झोमॅटो बॉयची प्रेरणा घ्या असं म्हटलं आहे. तो यामध्ये म्हणतो की, “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मला वाटत नाही की तुम्हाला कठोर अभ्यास करण्याची दुसरी प्रेरणा आहे,” असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

शेअर केल्यापासून, व्हिडिओला 62,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 1,400 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. कमेंट विभागात, वापरकर्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. काहींना व्हिडिओ "प्रेरणादायी" वाटला, तर इतरांनी व्यस्त रस्त्यांवर नेव्हिगेट करताना लक्ष विचलित होऊ शकते असं म्हटले आहे. असाच एक व्हिडीओ बंगळूरमध्ये गाडीवर जाताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : बारामतीत पवार विरुद्ध पवार ;कोण मारणार बाजी वाहिनी की ताई?
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश ; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार का ?