सार

लोकसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली असून अनेक सेलिब्रिटी पक्ष प्रवेश करत असून अनेकांना उमेदवारी देखील जाहीर होत आहे. यातच आपल्या सगळ्यांचा लाडका गोविंदाने शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहुजा यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांचं पक्षात स्वागत केलं. गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बॉलिवूडमध्ये अत्यंत लोकप्रिय असताना गोविंदा यांनी २००४ साली काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. यात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र, खासदारम्हणून निवडून आल्यावर ते क्वचितच संसदेकडे फिरकले आणि मतदारसंघात देखील पाहिजे तेवढा वेळ देऊ शकले नव्हते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. त्यामुळे काही काळ राजकारणापासून दूर गेलेल्या गोविंदा यांनी हा पक्ष प्रवेश करत पुन्हा एकदा राजकीय कारकीर्द सुरु करणार असल्याचे दिसून आले.

गोविंदाच्या पक्ष प्रवेशावर काय म्हणाले शिंदे..

आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे गोविंदा शिवसेनेत आले आहेत. सगळ्याच समाजात लोकप्रिय असलेले गोविंदा यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छाही देतो. असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

गोविंदाने स्पष्ट केली भूमिका :

मी आज या पक्षात आलो आहे. १४ वर्षांचा वनवास संपला आहे आणि रामराज्यात आलो आहे असं मला वाटतं आहे. जी जबाबदारी मला दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असं गोविंदाने म्हटलं आहे. आजच्या दिवशी मी पक्षात प्रवेश करणे ही मला वाटतं की देवाची कृपा आहे आणि प्रेरणा आहे.

रामराज्य आणणाऱ्या पक्षात आलोय :

मी आजच्या दिवशी पक्षात प्रवेश करणे हा दैवी संकेत आहे. २००४ ते २००९ राजकारणात सक्रिय होतो. बाहेर पडल्यानंतर असं वाटलं होतं पुन्हा या क्षेत्रात देणार नाही. मात्र, मधल्या १४ वर्षाच्या वनवासानंतर जिथं रामराज्य आहे, त्याच पक्षात आलोय. तुम्ही जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.

आणखी वाचा :

सीएम केजरीवाल यांना दिलासा नाही, ईडी कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

अंबाजोगाई येथे खोदकामादरम्यान पुरातत्व विभागाला सापडले दोन मंदिरांचे अवशेष