सार

आप खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन स्वाती यांनी पोलिसांना दिले असून गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण होते असेही ट्विट करून सांगितले आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती आपचे नेते आणि खासदार संजय सिंग यांनी दिली. या झालेल्या घटनेवरून स्वाती यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. सदर झालेल्या घटनेबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी आशा स्वाती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून मांडली आहे. 

स्वाती मालिवाल यांनी काय केलं ट्विट? -
स्वाती मालिवाल ट्विटमध्ये म्हणतात की, "माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होत. माझ्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मी पोलिसांना दिली आहे. मला आशा आहे की योग्य ती कारवाई केली जाईल. गेले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले आहेत. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्यांचे मी आभार मानते. ज्यांनी माझ्या चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला देव त्यांना सुखी ठेवो. 

 

भाजपने या मुद्यावरून राजकारण करू नये - 
स्वाती मालिवाल यांनी भाजपने या मुद्यावरून राजकारण करून नये असे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात की, "देशात सध्या महत्वाच्या निवडणुका सुरु आहेत. स्वाती पालीवाल महत्वाच्या नसून देशाचे प्रश्न महत्वाचे असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे. माझी विशेष विनंती असून भाजपने या घटनेचे राजकारण करू नये असा उल्लेखही स्वाती यांनी यावेळी केला आहे. 

डीसीपी मनोज कुमार सिंह म्हणाले - 
स्वाती मालीवाल प्रकरणावर डीसीपी कुमार सिंह यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले आहे की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये 9:34 वाजता एक कॉल आला होता. या कॉलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. त्या कॉलवर बोलणारी महिला मुख्यमंत्र्यांच्या घरी असून त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचे पीए बीभव कुमार यांनी हल्ला केल्याची माहिती देण्यात आली. 

या प्रकरणासंदर्भात स्वाती मालिवाल यांनी औपचारिक तक्रार दाखल केली नसल्याचे मनोज कुमार यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बीभव कुमार यांना समन्स बजावले असून शुक्रवारी आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. स्वाती मालिवाल प्रकरणात रोजच एक नवीन ट्विस्ट येत असून आप सरकारवर या मुद्यावरून टीका केली जात आहे. 
आणखी वाचा - 
चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ आणि रिल्स शूट करण्यावर बंदी, 31 मार्चपर्यंत VIP दर्शनही नाही
Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन