घोषणा करतात, देत काहीच नाहीत, सर्व प्रकारची कर्जमाफ करा, विजय वडेट्टीवार

Share this Video

विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान ₹50 हजार मदत देण्याची आणि सर्व प्रकारचे शेतकरी कर्ज माफ करण्याची मागणी केली. पिकेच येणार नसतील तर शेतकरी पीक कर्ज किंवा इतर कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. मागील कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाढवण बंदरासाठी सुमारे ₹23 हजार कोटी आणि शक्तीपीठ महामार्गासाठी होणारा हजारो कोटींचा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली. मागील वर्षी ₹31,628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यापैकी ₹15,651 कोटीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. यावेळी तातडीने पंचनामे करून दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Related Video