MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Shopping Tips
D-Mart Offers
Pomegranate Leaf Tea Benefits
Gold & Silver Prices
Fridge Vastu Tips
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • India
  • DMart Founder : वयाच्या 48व्या वर्षी सुरू केलं डीमार्ट, राधाकिशन दमानींची भन्नाट स्टोरी

DMart Founder : वयाच्या 48व्या वर्षी सुरू केलं डीमार्ट, राधाकिशन दमानींची भन्नाट स्टोरी

वयाच्या तिसाव्या वर्षीच करिअर संपलं असं अनेकांना वाटतं. पण, यश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते, हे डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी सिद्ध करून दाखवलंय. त्यांची ही सक्सेस स्टोरी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

3 Min read
Author : Karishma R
Published : Sep 23 2026, 09:12 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
डिमार्ट फाऊंडर राधाकिशन दमानी
Image Credit : Asianet News

डिमार्ट फाऊंडर राधाकिशन दमानी

राधाकिशन दमानी यांचा जन्म राजस्थानच्या बिकानेरमध्ये झाला. त्यांचं बालपण मुंबईत गेलं. मुंबई विद्यापीठात त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, पण शिक्षण पूर्ण केलं नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शेअर मार्केटचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळला. १९९० च्या दशकात ते शेअर मार्केटमधील एक हुशार आणि सावध गुंतवणूकदार म्हणून ओळखले जायचे. मार्केटमध्ये एखाद्या शेअरची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा जास्त वाटली, तर ते त्यानुसार गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे.

शेअर मार्केटमधून चांगली संपत्ती कमावल्यानंतर दमानी यांनी आपला मोर्चा रिटेल व्यवसायाकडे वळवला. १९९९ मध्ये त्यांनी मुंबईतील नेरुळमध्ये 'अपना बाजार' चालवला. तिथून त्यांना रिटेल क्षेत्राचा चांगला अनुभव मिळाला.

या काळात त्यांनी रिटेल व्यवसायातील काही समस्या ओळखल्या. दुकानांचे जास्त भाडे, सप्लाय चेनमधल्या अडचणी आणि किमतींमधील तफावत या गोष्टींचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावर उपाय म्हणून त्यांनी एक नवीन मॉडेल बनवण्याचा निर्णय घेतला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पहिलं डिमार्ट पवईत उघडलं
Image Credit : Gemini AI

पहिलं डिमार्ट पवईत उघडलं

२००० च्या सुमारास दमानी यांनी शेअर मार्केटमधून लक्ष काढून रिटेल व्यवसायावर पूर्ण फोकस केला. त्यांनी 'ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केली. दुकानांसाठी जागा, सप्लाय चेन आणि प्रॉडक्ट्सची निवड यावर त्यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांनी मुंबईतील पवईमध्ये पहिलं डीमार्ट स्टोअर सुरू केलं. त्यावेळी दमानी यांचं वय ४७-४८ वर्षे होतं. या वयात बहुतांश लोक रिटायरमेंटचा विचार करतात. पण दमानी यांनी आपला शेअर मार्केटचा अनुभव रिटेल व्यवसायात वापरला.

सुरुवातीला डीमार्टची वाढ खूप संथ होती. भराभर शेकडो स्टोअर्स उघडण्याऐवजी, आपलं बिझनेस मॉडेल काम करतंय की नाही, हे त्यांनी आधी तपासलं. नऊ वर्षांत त्यांनी फक्त २५ स्टोअर्स उघडली. पण याच सावध पावलांमुळे डीमार्टचा पाया भक्कम झाला. स्टोअर मॅनेजमेंट, सप्लायर्ससोबतचे करार, स्टॉक मॅनेजमेंट आणि किमती ठरवणे या गोष्टींमध्ये कंपनीने चांगला अनुभव मिळवला.

Related Articles

Related image1
Monthly Budget Plan : पगार आला की लगेच संपतोय? हा प्लॅन फॉलो करा, पैसे नक्की वाचतील!
Related image2
DMart Shopping Tips : डी-मार्टला जाताय? या 5 वस्तू खरेदी करणं टाळाच
35
वेगळं बिझनेस मॉडेल
Image Credit : X

वेगळं बिझनेस मॉडेल

डीमार्टच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं वेगळं बिझनेस मॉडेल. इतर रिटेल कंपन्या जाहिराती आणि डिस्काउंटवर भर देऊन ग्राहकांना आकर्षित करत असताना, डीमार्टने कायमस्वरूपी कमी किमतींवर फोकस केला. डीमार्टमध्ये रोजच्या वापरातील किराणा माल, खाद्यपदार्थ, पर्सनल केअर, होम केअर, कपडे आणि इतर घरगुती वस्तू मिळतात.

कमी किमतीत वस्तू देण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतात आणि सप्लायर्ससोबत चांगले करार करतात. तसेच, दुकानात फक्त आवश्यक प्रॉडक्ट्सवरच लक्ष केंद्रित करून त्यांनी आपला खर्च आटोक्यात ठेवला.

डीमार्टचं आणखी एक महत्त्वाचं धोरण म्हणजे 'एव्हरीडे लो कॉस्ट - एव्हरीडे लो प्राईस' (EDLC-EDLP). म्हणजेच आधी कमी खर्चात माल खरेदी करायचा आणि त्याचा फायदा ग्राहकांना कमी किमतीच्या रूपात द्यायचा. कंपनीने आपल्या २०२६ च्या वार्षिक अहवालातही या धोरणाचा उल्लेख केलाय. लॉजिस्टिकचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी स्टोअर्स दूर उघडण्याऐवजी एकाच भागात (क्लस्टर) उघडण्यावर भर दिला. मोठ्या जाहिराती न करता, कमी किमती, चांगल्या वस्तू आणि ग्राहकांच्या विश्वासावर त्यांनी आपला ब्रँड मोठा केला.

45
2017 मध्ये आयपीओ आला
Image Credit : Pixabay

2017 मध्ये आयपीओ आला

सुरुवातीची अनेक वर्षे डीमार्टची वाढ संथ होती. पण २०१० नंतर त्यांनी वेग पकडला. २०१७ मध्ये ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सचा आयपीओ (IPO) आला आणि कंपनीच्या विस्ताराला मोठी चालना मिळाली. मात्र, दमानी यांनी वेगापेक्षा नफ्याला जास्त महत्त्व दिलं. प्रत्येक स्टोअरचा परफॉर्मन्स चांगला राहील आणि खर्च आटोक्यात राहील, याची त्यांनी आधी काळजी घेतली.

याचाच परिणाम म्हणजे ३१ मार्च २०२६ पर्यंत ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स देशभरात ५०० डीमार्ट स्टोअर्स चालवत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातच कंपनीने ८५ नवीन स्टोअर्स सुरू केली. जून २०२६ च्या अखेरीस स्टोअर्सची संख्या ५०३ वर पोहोचली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात कंपनीने तब्बल ६६,९६८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला.

55
व्यवसायाची सुरुवात कोणत्याही वयात करता येते
Image Credit : Google

व्यवसायाची सुरुवात कोणत्याही वयात करता येते

राधाकिशन दमानी अत्यंत साधं जीवन जगतात. ते मीडियापासून नेहमी दूर राहतात. व्यवसायातही त्यांची स्टाईल खूप शांत आहे. कमी कर्ज, खर्चावर नियंत्रण, नफा पुन्हा व्यवसायात गुंतवणे आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे, या गोष्टींना त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं.

डीमार्टच्या गोष्टीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, यश रातोरात मिळत नाही. वयाच्या ४७-४८ व्या वर्षी पहिलं स्टोअर सुरू करणाऱ्या दमानी यांनी सुरुवातीला खूप सावध पावलं टाकली. पण बिझनेस मॉडेल भक्कम झाल्यानंतर त्यांनी विस्तार वाढवला. बिझनेस सुरू करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते, हे दमानी यांच्या प्रवासातून दिसून येतं. योग्य विचार, संयम, खर्चावर नियंत्रण आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यास, उशिरा सुरू केलेला व्यवसायही खूप मोठा होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे राधाकिशन दमानी.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
PM Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली पेजावर मठाच्या स्वामींची भेट, जन्मशताब्दी लोगोचे अनावरण
Recommended image2
Autumnal Equinox: २३ सप्टेंबरला घडणार खगोलीय चमत्कार, दिवस-रात्र होणार समान!
Recommended image3
Khushboo Patani: बिहारमधील मुलीवरील अत्याचारावर खुशबू पाटणी संतापली, म्हणाली - 'असा कसा विश्वगुरू?'
Recommended image4
National Film Awards: राष्ट्रपती मुर्मूंचा कलाकारांना सल्ला, हानिकारक उत्पादनांची जाहिरात करू नका
Recommended image5
Amit Shah: भारतातून ड्रग्जचा समूळ नाश करणार, अमित शाहांनी दिली डेडलाईन
Related Stories
Recommended image1
Monthly Budget Plan : पगार आला की लगेच संपतोय? हा प्लॅन फॉलो करा, पैसे नक्की वाचतील!
Recommended image2
DMart Shopping Tips : डी-मार्टला जाताय? या 5 वस्तू खरेदी करणं टाळाच
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved