Lok Sabha Election 2024 :महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 53.56% मतदान; उर्वरित 12 राज्यांची परिस्थिती कशी ? जाणून घ्या

| Published : Apr 26 2024, 06:40 PM IST / Updated: Apr 26 2024, 09:48 PM IST

voting 01.jpg

सार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. देशातील 12 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशासह 88 मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य देखील मतपेटीत कैद झालं आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. देशातील 12 राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह 88 मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य देखील मतपेटीत कैद झालं असून महाराष्ट्रात पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघातील 204 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.यामध्ये एकूण 1,49,25,912 मतदार पात्र ठरले होते. तर देशभरात शुक्रवार (26 एप्रिल) संध्याकाळपर्यंत एकूण 60.96 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आसाममध्ये 70.66%, बिहारमध्ये 53.03%, छत्तीसगडमध्ये 72.13%, जम्मू-काश्मीरमध्ये 67.22%, कर्नाटकमध्ये 63.90%, केरळमध्ये 63.97%, मध्य प्रदेशात 54.42%, महाराष्ट्रात 53.56%, मणिपूरमध्ये76.06 %, राजस्थानमध्ये 59.19%, त्रिपुरामध्ये 76.23%, उत्तर प्रदेशात 52.64% आणि पश्चिम बंगालमध्ये 71.84% मतदान झाले होते. 

 

 

अमरावती लोकसभेतील मेळघाटच्या 5 गावांचा मतदानावर बहिष्कार
अमरावती लोकसभेतील मेळघाट मधल्या 5 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. रंगुबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, खोपमार या गावांचा यात समावेश आहे. ही गावं अजूनही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला. 

या ठिकाणी झाले दुसऱ्या टप्प्यातील मतदान :
दुसऱ्या टप्प्यात बिहारमधून 5, छत्तीसगडमधून 3, कर्नाटकमधून 14, मध्य प्रदेशमधून 7, उत्तर प्रदेशमधून 8, पश्चिम बंगालमधून 3, महाराष्ट्रातील 8, राजस्थानमधून 13, केरळमधून 20, आसाम आणि त्रिपुरामधून 5, जम्मू-काश्मीर आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान झाले. 

आणखी वाचा : 

500 रुपयांत गॅस सिलेंडर, शासकीय नोकरीत महिलांना आरक्षण....शरद पवारांच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्यात या मोठ्या घोषणा

'शेतकऱ्यांची माफी मागा...' अमित शाहांच्या विधानावर शरद पवारांचे प्रतिउत्तर, म्हणाले...