Virat Kohli : विराट कोहली लंडनला झाला रवाना, अनुष्का शर्मा आणि कुटुंबियांना भेटण्याची लागली ओढ

| Published : Jul 05 2024, 11:38 AM IST

विराट कोहली

सार

भारतीय संघाने काल मोठ्या जल्लोषात सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले. त्यांच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर चाहते आल्याचे दिसून आले. यावेळी मारिन ड्राईव्हच्या परिसरात खूप चाहत्यांची गर्दी दिसून आली.

भारतीय संघाने काल मोठ्या जल्लोषात सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले. त्यांच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर चाहते आल्याचे दिसून आले. यावेळी मारिन ड्राईव्हच्या परिसरात खूप चाहत्यांची गर्दी दिसून आली. भारतीय संघावर यावेळी चाहत्यांनी मन भरून प्रेम केल्याचे दिसून आले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना यावेळी डान्स करताना सर्वच चाहते आनंदात असल्याचे दिसून आले. 

विराट कोहली लंडनला झाला रवाना - 
भारतीय क्रिकेटपट्टू विराट कोहली हा सेलिब्रेशन झाल्यानंतर त्याची पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी लंडनला रवाना झाला. तो लंडनला पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामीका आणि मुलाला भेटण्यासाठी गेला. रात्रीच्या वेळीच तो तिकडे रावण झाल्याचे दिसून आले. यावेळी त्याने काळ्या रानगाचा शर्ट आणि डोक्यात टोपी घातली होती. तो विमानतळावर आकर्षक अशा स्वरूपात दिसत होता. 

कुटुंबियांना भेटण्यासाठी कोहली आतुर - 
विराट कोहली हा त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतुर असल्याचे यावेळी दिसून आले. विराट कोहली यावेळी त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला. तो विमानतळावरून एकदम घाईत गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. क्रिकेट सामना संपल्यानंतर विराट त्याच्या कुटुंबासोबत कॉलवर बोलत असल्याचे दिसून आले. यावेळी कुटुंबियांशी त्याने मन मोकळं करून संवाद साधला होता. त्याने फोनवर बोलताना कॉमेडी प्रकारचे कृत्य केल्याचे दिसून आले होते. 

त्याने अंतिम सामना संपल्यानंतर संवाद साधून मन मोकळे केले होते. त्याचे यावेळी संवाद साधत असताना फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आले होते. विराट कोहलीने त्याच्या कुटुंबियांना वेस्ट इंडिजमधील समुद्राकडील काही क्षण दाखवल्याचे दिसून आले होते. 
आणखी वाचा - 
UK Election 2024 Live: आतापर्यंत 137 जागांचे निकाल जाहीर, लेबर पार्टीला 108 तर ऋषी सुनक यांच्या पक्षाला केवळ 14 जागा
Raj Thacekray on Porsche car Accident : हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका