सार

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये एका खासगी कंपनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिनेमातील एखाद्या हिरोप्रमाणे एण्ट्री घेतली. पण पुढे जे काही झाले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Viral Video : हैदराबादमधील (Hyderabad) रामोजी फिल्म सिटीत (Ramoji Film City) एका खासगी कंपनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिनेमातील एखाद्या हिरोसारखी एण्ट्री घेण्याचे ठरविले होते. याबद्दल कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते.

कंपनीच्या सिल्व्हर जुबलीनिमित्त (Silver Jubilee) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सर्वकाही खास करण्याचे ठरविण्यात आले होते. कार्यक्रमाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येतेय की, सर्वजण कार्यक्रमाच्या हॉलमध्ये बसले आहेत. स्टेजवर एका पिंजऱ्यातून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षांनी एण्ट्री घेताना दिसून येत आहेत. याशिवाय पिंजाऱ्याच्या आजूबाजूने आतिशबाजीही सुरू असल्याचे दिसतेय. सर्वजण त्या क्षणाचा आनंद घेत आहेत.

क्रेनच्या केबलच्या मदतीने टांगला होता पिंजरा
क्रेनवरील केबलच्या मदतीने पिंजरा टांगण्यात आला होता. केबलच्या मदतीनेच पिंजरा खाली उतरवण्यात येत होता. यादरम्यान, अचानक पिंजऱ्यामध्ये उभे राहिलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष खाली कोसळले गेले.

दुर्घटनेनंतर तातडीने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मृत्यू झाला आणि अध्यक्षांना गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी दिली दुर्घटनेची अधिक माहिती
मृत्यू झालेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षांचे नाव संजय शाह (वय 56 वर्ष) होते. याशिवाय कंपनीच्या अध्यक्षांचे नाव राजू दतला (वय 52 वर्ष) असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या दुर्घटनेबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, लोखंडाचा पिंजरा स्टेजवरुन खाली उतरवला जात होता. त्यावेळीच क्रेनची केबल एकाबाजूने तुटली आणि पिंजऱ्यामधील दोघेही जमिनीवर कोसळले गेले.

आणखी वाचा : 

Vadodara Boat Capsize : वडोदरा येथील तलावात बोट उलटल्याने 14 जणांचा मृत्यू, 18 जणांच्या विरोधात FIR दाखल

ना माचिस...ना लायटर, तरुणाने चक्क बोटाने पेटवला गॅस (Watch Viral Video)

घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अशी रद्द करा भारतीय रेल्वेची Counter Ticket