सार

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या हाताच्या बोटाने चक्क गॅस पेटवताना दिसून येत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक तरुण त्याच्या हाताने गॅस पेटवत आहे. खरंतर आपण गॅस पेटवण्यासाठी माचिस किंवा लायटरचा वापर करतो. पण तरुणाने चक्क हाताच्या बोटाने गॅस पेटवल्याचे पाहून कोणालाही त्यावर विश्वास बसत नाहीय.

सोशल मीडियामध्ये या व्हिडीओला आतापर्यंत 729 हजार व्हूज मिळाले असून 10.6 हजार जणांनी पसंत केले आहे. याशिवाय व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांना व्हिडीओ पाहून असा देखील प्रश्न पडलाय की, तरुणाने नक्की अशी कोणती जादू केलीय? याशिवाय काहींना वाटतेय हा एक चमत्कार आहे.

तरुणाने नक्की कसा पेटवला बोटाने गॅस?
व्हिडीओमध्ये दिसून येतेय की, तरुण प्लास्टिकची खुर्ची घेऊन गॅसजवळ बसला आहे. तरुणाने आपले पायही खुर्चीवर ठेवले आहेत. यानंतर दुसरा मुलगा त्या तरुणाजवळ येतो आणि त्याच्या डोक्यावर चादर टाकतो. यादरम्यान, खुर्चीवर बसलेला तरुण आपल्या बोटाने गॅस पेटवताना दिसून येत आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या संमिश्र प्रतिक्रिया
तरुणाचा बोटाने गॅस पेटवताना व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी म्हटले आहे की, अशाप्रकारचे चाळे घरच्याघरी करू नये. हे खूप धोकादायक आहे.

आणखी वाचा : 

या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा

Cyber Insurance म्हणजे काय? डिजिटल युगात या कारणास्तव आहे महत्त्वाचा

तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO