सार

गुजरातमधील वडोदरा येथील हरणी तलावात बोट उलटल्याची दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. बोटीवर खासगी शाळेचे 27 विद्यार्थी लाईफ जॅकेटशिवाय बसले होते. 

Vadodara Boat Capsize : गुजरातमधील वडोदरा येथील हरणी (Harni Lake) तलावात शाळकरी मुलांची बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता पुढील कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. 

हरणी तलावातील बोटीच्या संचलनासंबंधित 18 जणांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या टीमकडून अन्य जणांना शोध घेतला जात आहे.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी (Harsh Sanghavi) यांनी 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. हरणी तलावात बोट उलटल्याने 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नक्की काय घडले?
न्यू सनराइज शाळेचे विद्यार्थी शिक्षकांसोबत हरणी तलावाच्या येथे पिकनिकसाठी आले होते. येथे आल्यानंतर तलावातील बोटीची क्षमता 14 जणांची असतानाही 31 जणांना बोटीवर बसवण्यात आले. यामध्ये 7 विद्यार्थ्यांसह चार शाळेच्या शिक्षकांचा समावेश होता. बोटीवर असलेल्या काहींनाच लाईफ जॅकेट देण्यात आले होते.

यानंतर बोटिंग करताना अचानक बोट उलटली गेली. यामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. गुरुवारी (18 जानेवारी) संध्याकाळी उशिरा मृतांचा आकडा वाढला गेला. याशिवाय तलावात बुडालेल्या अन्य जणांचाही शोध घेतला जात आहे. बोट उलटल्याच्या घटनेनंतर आताही घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

पालकांची शाळेच्या विरोधात कार्यवाही करण्याची मागणी
हरणी तलावात झालेल्या दुर्घटनेनंतर न्यू सनराइज शाळेच्या सुरक्षिततेत अधिक वाढ करण्यात आली आहे.या दुर्घटनेत जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेच्या विरोधात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याशिवाय 14 जणांची क्षमता असणाऱ्या बोटीत ऐवढ्या संख्येने व्यक्तींना कसे बसवले? असा सवालही पालकांकडून उपस्थितीत केला जात आहे.

PMOनी व्यक्त केला शोक
वडोदरा बोट दुर्घटनेत PMO कडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. या संबंधित पीएमओकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये मृत व्यक्तींच्या परिवाराला PMNRF कडून दोन लाखांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय जखमींना 50 हजार रूपयांची मदत केली जाणार आहे.

गुजरात सरकारही करणार आर्थिक मदत
गुजरात सरकारने देखील बोट दुर्घटनेत आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. गुजरात सरकारने मृत व्यक्तींच्या परिवाराला चार लाख रूपये आणि जखमींना 50 हजार रूपये आर्थिक मदत देणार असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : 

IndiGoच्या प्रवाशांनी रनवे वर खाल्ले फूड, मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांसह इंडिगो कंपनीला केंद्राने धाडली नोटीस

ना माचिस...ना लायटर, तरुणाने चक्क बोटाने पेटवला गॅस (Watch Viral Video)

FASTag येत्या 31 जानेवारीपर्यंत करा अपडेट, अन्यथा.…