सार

मुंबई विमानतळाच्या रनवे वर बसून डबे खाल्ल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता केंद्राने मुंबई विमानतळ अधिकारी आणि इंडिगो कंपनीला नोटीस धाडली आहे.

Mumbai Airport : काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळाच्या रनवे वर बसून काही प्रवाशांनी डबे खाल्ल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यासंदर्भात आता केंद्र सरकारने इंडिगो आणि मुंबई विमानतळाला नोटीस धाडली आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने विमानतळाच्या अधिकाऱ्यांसह इंडिगो विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात अधिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे. 

विमानतळाच्या चक्क रनवे वर जेवले प्रवासी 
14 जानेवारीला गोवा ते दिल्ली मार्गाने जाणारे विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. यानंतर प्रवाशांनी रनवे वर डबे खाताना दिसले. या प्रकरणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी सोमवारी (15 जानेवारी) या संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक बोलावली होती.

खरंतर दिल्लीला जाणारे इंडिओचे फ्लाइट 6E2195 धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले नाही. यामुळे रविवारी (14 जानेवारी) विमान मुंबईत विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
गोव्यावरुन दिल्लीला जाणारे इंडिगो फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्याने प्रवाशांना काही समस्यांचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये इंडिगोचे प्रवासी मुंबई विमानतळावरील जमिनीवर बसल्याचे दिसून आले. याशिवाय व्हिडीओमध्ये काही प्रवासी रनवे वर बसूनच डबे खाताना दिसून आले.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत धुक अधिक वाढल्याने दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या शेकडो फ्लाइट्सला उडण्यासाठी उशिर होत आहे. अशातच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी घोषणा केली की, विमान वाहतूक मंत्रालय भविष्यात अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी आवश्यक पावले उचलणार आहे.

आणखी वाचा : 

ना माचिस...ना लायटर, तरुणाने चक्क बोटाने पेटवला गॅस (Watch Viral Video)

FASTag येत्या 31 जानेवारीपर्यंत करा अपडेट, अन्यथा....

IndiGoचा कॅप्टन घोषणा करत असतानाच प्रवाशाने केली मारहाण, कारण…WATCH VIDEO