Uttar Pradesh Train Accident : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील चुनार रेल्वे स्थानकात एक मोठी दुर्घटना घडली आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी आलेले भाविक रेल्वेतून चुकीच्या दिशेने उतरल्याने त्यांचा अपघात झाला आहे.

Uttar Pradesh Train Accident : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगा स्नानासाठी आलेल्या भाविकांना ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना अशावेळी घडली जेव्हा चुकीच्या दिशेने भाविक रेल्वे रुळांवर उतरले आणि समोर वेगाने आलेल्य कालका-हावडा एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. दुर्घटनेनंतर स्थानकात मोठा गदारोळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचत बचाव कार्य सुरू केले.

नक्की काय घडले?

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक एका दुसऱ्या ट्रेनने चुनार रेल्वे स्थानकात आले होते. त्यांना प्लॅटफॉर्मवर उतरायचे होते पण घाईघाईत किंवा चुकून दुसऱ्या बाजूला उतरले गेले. त्याचवेळी दुसऱ्या मार्गावरुन कालका येथून हावडाला जाणारी ट्रेन वेगाने येत होती. तेव्हाच ही दुर्घटना घडली आणि भाविकांचा मृत्यू झाला.

स्थानकात पोलीस सुरक्षा वाढवली

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानकाच प्रवाशांमध्ये गदारोळ निर्माण झाला. यामुळे रेल्वे सुरक्षा बल, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने तेथील स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या सर्वांची ओखळ पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या स्थानकात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.