सार
दिल्लीतील अलीपुर येथील एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे.
Delhi Fire : दिल्लीतील अलीपुर येथील एका पेंट फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (16 फेब्रुवारी) घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर रुपात जखमी झाले आहेत. याबद्दलची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीपुर येथील दयालपुर मार्केटमधील फॅक्टरी परिसरातील एका पेंट फॅक्टरीला आग लागल्यानंतर 11 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दिल्लीतील अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, गुरुवारी संध्याकाळी पेंट फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली असतात 22 अग्निशनम दलाच्या गाडा घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री 9 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. पोलिसांच्या मते, स्फोट झाल्याने कारखान्याला आग लागली. या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी एक टीम स्थापन करण्यात आली आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पोलिसांनी सांगितले की, फॅक्टरीमध्ये पेंटसाठी लागणारे साहित्य तयार केले जात होते. दुर्घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील कारवाई सुरू आहे. यादरम्यान, श्यामू कुमार नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की, "19 वर्षीय भाऊ शुभम फॅक्टरीमध्ये काम करतो. पण माहिती नाही माझा भाऊ कुठे आहे. तो नुकताच फॅक्टरीमध्ये कामाला लागला होता. फॅक्टरीमधील अन्य जणांसोबत तो बेपत्ता झाले आहे. याशिवाय काहीजणांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे. "
याआधी मे 2022 मध्ये मुंडका मेट्रो स्टेशनजवळ एका चार मजली व्यावसायिक इमारतील भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू होण्यासह काहीजण जखमी झाले होते.
आणखी वाचा :
'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे...' IndiGo च्या विमानातील टिश्यू पेपरवर लिहिलेल्या मेसेजने खळबळ