रवींद्र जडेजावर वडिलांनी लावलेल्या आरोपांवर क्रिकेटरची पत्नी संतप्त, दिली अशी प्रतिक्रिया

| Published : Feb 12 2024, 01:57 PM IST / Updated: Feb 12 2024, 02:03 PM IST

Rivaba-Jadeja--response-on-Ravindra-Jadeja-father-acquisition

सार

सध्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. अशातच क्रिकेटरच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Rivaba Jadeja on Father in law allegations : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी आणि भाजपची आमदार रीवाबा जडेजावर (Rivaba Jadeja) काही आरोप लावण्यात आले आहेत. आरोप रवींद्र जडेचा याचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी लावले आहे. अनिरुद्ध जडेजा (Anirudh Singh Jadeja) यांनी आरोप लावत म्हटले की, त्यांचा मुलगा आणि सूनेसोबत त्यांचा काहीही संबंध नाही. मी त्यांच्यासोबत राहत नाही. अशातच रवींद्र जडेजाच्या पत्नीने सासऱ्यांनी लावलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

रीवाबाने दिली अशी प्रतिक्रिया
मीडियाशी संवादादरम्यान भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीला तिच्या सासऱ्यांनी लावलेल्या आरोपांबद्दल विचारले असता ती संतप्त झाली. रीवाबाने म्हटले की, “आज मी येथे का आहे? तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास मला प्रश्न विचारू शकता.” खरंतर, रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा गुजरातमधील जामनगर येथून भाजपची आमदार आहे.

रवींद्र जडेजाच्या वडिलांनी लावलेत हे आरोप
रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी म्हटले की, माझा मुलगा आणि सून यांच्यापासून वेगळा जामनगर येथे एकटा राहतो. नुकत्याच अनिरुद्ध जडेजा यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले होते, त्यांचा माझा मुलगा आणि सूनेशी काहीही संबंध नाही. आम्ही त्यांना बोलवत नाही ना ते मला बोलवतात. खरंतर ही समस्या लग्नाच्या दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासून सुरू झाली होती. रवींद्र माझा मुलगा आहे, मला त्याच्याबद्दल वाईट वाटते.

रवींद्र जडेजाने आरोपांवर दिले स्पष्टीकरण
वडिलांनी लावलेल्या आरोपांवर रवींद्र जडेजाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रवींद्रने म्हटलेय की, “इंटरव्यूमध्ये बोलण्यात आलेल्या काही गोष्टी निरर्थक आणि खोट्या आहेत. खरंतर त्या एकतर्फी दिल्या गेलेल्या प्रतिक्रिया आहेत, ज्याचे मी खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. मला देखील खूप काही बोलायचे आहे. पण त्या गोष्टी मी सार्वजनिकपणे बोलू शकत नाही.”

आणखी वाचा : 

कतारच्या तुरुंगातून आठ पैकी सात माजी नौसैनिक भारतात परतले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार (Watch Video)

'ए मेरे वतन के लोगों' सारखी गाणी ऐकून ब्रेन स्ट्रोकवर केले जाणार उपचार? AIIMS ची नवी म्युझिक थेरपी असे करणार काम

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाआधी दिल्ली पोलीस हाय अ‍ॅलर्टवर, हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद