महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी झाले बेशुद्ध, त्यांची प्रकृती आता कशी आहे?

| Published : Apr 24 2024, 06:53 PM IST / Updated: Apr 24 2024, 06:54 PM IST

nitin gadkri

सार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला मोठी रंगत आली असून यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. यवतमाळ येथील शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेला संबोधित करत असताना राजश्री पाटील यांच्या सभेला करत होते. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला मोठी रंगत आली असून यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. यवतमाळ येथील शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेला संबोधित करत असताना राजश्री पाटील यांच्या सभेला संबोधित करत असताना नितीन गडकरी यांची तब्येत अचानक बिघडली. ते अचानक बेशुद्ध झाले, त्यानंतर त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते बरे झाले आणि स्टेजवर येऊन त्यांनी भाषण केले. यावेळी ते बेशुद्ध झालेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

नितीन गडकरी म्हणाले, ‘आता मी स्वस्थ आहे’ - 
सोशल मीडियावर नितीन गडकरी म्हणाले, "महाराष्ट्रातील पुसद येथील रॅलीदरम्यान उष्णतेमुळे अस्वस्थ वाटले. पण आता मी पूर्णपणे निरोगी आहे आणि पुढील सभेला उपस्थित राहण्यासाठी वरुडला रवाना होत आहे. त्यांनी लिहिले की, तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून आधी भावना गवळी या खासदार होत्या. आता हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. 

नितीन गडकरी यांना तातडीने हलवले - 
नितीन गडकरी यांचे शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी येथे प्रचारसभा चालू होती. नितीन गडकरी यांचे भाषण चालू असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांच्यावर या घटनेनंतर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर ते भाषण करायला स्टेजवर आले होते. स्टेजवर आल्यानंतर त्यांनी भाषण केले आणि याबाबतची माहिती सोशल मीडियावर टाकली आहे. 
आणखी वाचा - 
Patanjali Ads Case : 'पुन्हा चूक होणार नाही...', सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी मागितली माफी
मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा, बाहेर पडलात तर होऊ शकते…