मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा, बाहेर पडलात तर होऊ शकते...

| Published : Apr 24 2024, 11:54 AM IST

Heat wave

सार

महाराष्ट्रात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांचे तापमान दिवसेंदिवस सर्वोच्च तापमान सीमेवर पोहचत आहे. 

महाराष्ट्रात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांचे तापमान दिवसेंदिवस सर्वोच्च तापमान सीमेवर पोहचत आहे. रायगड, ठाणे आणि मुंबईच्या काही भागांमध्ये 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे या शहरांमध्ये उष्णतेची लाट तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आली दुसरी उष्णतेची लाट - 
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील ही दुसरी उष्णतेची लाट आली आहे. 15 ते 16 एप्रिल रोजी मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये तीव्र तापमान होते. नवी मुंबईच्या काही भागांमध्ये तर 41 अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढले होते. उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना उष्माघाताचा त्रास मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे उष्णतेची लाट धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. 

लोकांनी कोणते काळजी घ्यावी? 
लोकांनी उष्णतेचा शक्य होईल तितका संपर्क टाळावा, पुरेसे पाणी प्यावे आणि हायड्रेटेड राहावे, हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे घालावेत, डोके झाकून घ्यावे, दुपारच्या वेळी बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी उनात जायचे टाळल्यास त्यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही असे यात म्हटले आहे. 

उन्हाचा त्रास झाल्यामुळे अनेक जणांना त्रास होतो, अशा व्यक्तींनी शक्यतो उनात जाऊ नये अन्यथा त्यांना या त्रासाचा परत एकदा त्रास सहन करावा लागू शकतो. उन्हात गेल्यानंतर आपण संरक्षण म्हणून डोक्यावर कॅप घालावी, थंड पदार्थ (दही, लस्सी किंवा) ताक याचे सेवन करावे. उन्हाळ्यात शक्यतो थंड पदार्थ जास्तीत जास्त खावेत, त्यामुळे आपल्याला त्रासापासून बचाव होईल. 
आणखी वाचा - 
अमेरिकेत मृत्यूनंतर सरकारच्या खात्यात जाते 50 टक्के संपत्ती, पण भारतात..., सॅम पित्रोदांनी केलेल्या विधानामुळे राजकरण तापले
US : इंधन घेऊन जाणाऱ्या एअरक्राफ्टचा अलास्कामध्ये अपघात, दोन जणांचा मृत्यू