सार

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. 

भारतात सध्या टी 20 वर्ल्ड कपचा फेवर वाढत चालला आहे. हा फेवर वाढल्यामुळे आयपीएल स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग मोठा मिळत असल्याचे दिसून येत आहे. आता लवकर टी 20 वर्ल्ड कप होणार असून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता यामध्ये रोहित शर्मा हा संघाचा कर्णधार असून हार्दिक पांड्या हा उपकर्णधार असल्याची माहिती समजली आहे. 

भारतीय संघात निवड झालेले खेळाडू कोण आहेत? 
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, उजवेंद्र चहल, अर्षदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज 
राखीव खेळाडू - 
शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान 

ही निवड झालेल्या खेळाडूंची नावे असून आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संघात अष्टपैलू खेळाडूंसोबतच गोलंदाज आणि फलंदाजांचा समतोल साधता आला आहे. यावर्षी भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड कप जिंकावा अशी, चाहत्यांची इच्छा असून आता काय होत ते लवकरच दिसून येणार आहे. 
आणखी वाचा - 
बाबा रामदेव यांना अजून एक मोठा धक्का; उत्तराखंड सरकारकडून दृष्टी आय ड्रॉपसह पतंजलीच्या १४ उत्पादनांचा परवाना रद्द
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात 8 जणांच्या मृत्यूची शक्यता? अपघातात घटनास्थळी आढळले फक्त...