मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात 8 जणांच्या मृत्यूची शक्यता? अपघातात घटनास्थळी आढळले फक्त...

| Published : Apr 30 2024, 12:27 PM IST

Rajasthan Road accident

सार

नाशिक जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला असून त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दिवसेंदिवस रस्त्यांची गुणवत्ता जरी सुधरत असली तरीही अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात मन हेलावून टाकणारा एक अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळील राहुड घाटात हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. येथे एसटी बस आणि ट्रकची जोरात धडक झाली असून यामध्ये सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. 

अपघात कोठे झाला - 
हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात झाला असल्याची माहिती समजली आहे. अपघाताची माहिती मिळताच तेथे उपथित असणाऱ्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घाई करण्यात येत होती. या मुंबई आग्रा महामार्गावर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून प्रवाशांचे हाल होत आहेत. ट्राफिक असल्यामुळे हे होत असल्याचे दिसून आले आहे.