सार

पतंजली संस्थेने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.त्यानंतर बाबा रामदेव आणखी धक्का बसला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेदिक आणि युनानी सेवा राज्य परवाना प्राधिकरणाने पंतजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्या फार्मसी उत्पादनांचा परवाना रद्द केला

रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेद संस्थेचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून दिलगिरी देखील व्यक्त करत जाहिरात छापली होती.मात्र त्यानंतर बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेदिक आणि युनानी सेवा राज्य परवाना प्राधिकरणाने पंतजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्या फार्मसी या कंपनीच्या 14 उत्पादनांचा परवाना रद्द केला आहे.

बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्या विरोधात औषध जाहिरात कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल करण्याची परवानगी दिली आहे आणि त्यांच्या 14 उत्पादनांचे उत्पादन परवाने निलंबित केले आहेत. असे उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. प्रतिज्ञापत्रात, उत्तराखंड सरकारने आपल्या राज्य परवाना प्राधिकरणाकडे असल्याचे सादर केले आहे. कायद्याच्या विरोधात असलेल्या जाहिरातींचे प्रकाशन केल्यास दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा यासह कठोर शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे.

या औषधांचा परवाना रद्द :

प्राधिकरणाने म्हंटले आहे की, आम्ही 15 एप्रिल रोजी दिव्या फार्मसी आणि पंतजली आयुर्वेद लिमिटेडचा परवाना रद्द करणारा आदेश काढला असून पतंजलीच्या श्वासारी गोल्ड, स्वासारी वटी, ब्रोंकोम, श्वासारी प्रवाही, श्वासारी अवलेह, मुक्त वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम, बीपी ग्रीट, मधुग्रीत, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत एडवांस, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या उत्पादनांचा परवाना तात्काळ रद्द केला आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाईची मागणी :

इंडियन मेडिकल असोसिएशनने ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पतंजली विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये मधुमेह, हृदयरोग, उच्च किंवा कमी रक्तदाब यासह विशिष्ट रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी विशिष्ट उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी आहे.

फौजदारी तक्रार दाखल :

यावर उत्तर देताना प्राधिकारणाने म्हंटले की, 16 एप्रिल रोजी हरिद्वारच्या जिल्हा आयुर्वेदिक आणि युनानी अधिकारी यांनी रामदेव, दिव्या फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या विरोधात औषध आणि प्रसाधने कायद्याच्या कलम 3, 4 आणि 7 अनुसार फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

आणखी वाचा :

आरक्षण संपवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- आमच्याकडे आवश्यक मते आहेत, प्रश्नच उद्भवत नाही

हुबळी नेहा हत्या प्रकरण: न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर जस्टिस फॉर नेहा आणि सेव्ह हिंदू गर्ल असे बॅनर लावून केली न्यायाची मागणी

अमित शाह यांच्या हॅलीकॅप्टरचे नियंत्रण हरवले, नंतर झाले असे काही की…