सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला

Share this Video

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेडमध्ये माता साहिब गुरुद्वारात हल्ला झाल्याची घटना घडली. दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर असताना बादल विविध गुरुद्वारांना भेट देत होते. त्यावेळी निहंग शीखांच्या वेशातील एका व्यक्तीने कृपाणचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.या हल्ल्यात सुखबीर सिंह बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना वाचवताना संबंधित पोलीस निरीक्षकही जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी बादल यांच्या पत्नी आणि लोकसभा खासदार हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या.हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दोन जण हल्ल्यात सहभागी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हा दावा फेटाळला आहे. केवळ एका आरोपीचा सहभाग असून त्याचे नाव जसपाल सिंह असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो गेल्या दोन वर्षांपासून माता साहिब गुरुद्वारात सेवदार म्हणून कार्यरत होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले असून हल्ल्यामागील नेमका हेतू शोधण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Related Video