Sonia Gandhi Shifts To Rajya Sabha : सोनिया गांधींकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल

| Published : Feb 14 2024, 02:41 PM IST / Updated: Feb 14 2024, 02:46 PM IST

sonia gandhi

सार

सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील लोकसभेच्या खासदार आहेत. याआधी सोनिया गांधी अमेठी येथील लोकसभा खासदार राहिल्या होत्या.

Sonia Gandhi Shifts To Rajya Sabha : काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी राज्यसभेच्या जयपूर (Jaipur) येथून बुधवारी (14 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभेच्या खोली क्रमांक 106 मध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांनी अर्ज दाखल केला.

अशोक गहलोत यांनी केले मोठे विधान
राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. याशिवाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 20 फेब्रुवारी आहे. याबद्दलच सोनिया गांधी यांच्या जयपूर आगमनाबद्दल अशोक गहलोत यांनी मोठे विधान केले आहे. गहलोत यांनी म्हटले की, सोनिया गांधी अशा राजकीय नेत्या आहेत ज्यांनी पंतप्रधानांच्या पदाचा त्याग केला. आता सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जागेवर राज्यसभेत जाणार आहेत.

सोनिया गांधी आजच जयपूर येथून दिल्लीला जाणार
सोनिया गांधींनी आजच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज संध्याकाळपर्यंत सोनिया गांधी दिल्लीला जाणार आहेत. राजस्थानमधील काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी म्हटले, राजस्थानसाठी गर्वाची बाब आहे की सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार आहेत.

पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार सोनिया गांधी
सध्या सोनिया गांधी उत्तर प्रदेशाती रायबरेली येथील लोकसभेच्या खासदार आहेत. याआधी सोनिया गांधी अमेठी येथून लोकसभेच्या खासदार होत्या. पण आता सोनिया गांधी लोकसभा सोडून राज्यसभेवर जाणार आहेत. पहिल्यांदाच असे होणार आहे की, सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार आहेत. काँग्रेसचा दिग्गज नेत्या सोनिया गांधी वर्ष 1999 पासून सातत्याने लोकसभेच्या खासदार आहेत.

आणखी वाचा : 

Farmers Protest : UPA सरकारने MSP ची मागणी फेटाळल्याचे वर्ष 2010 च्या एका रिपोर्टमधून आले समोर

Farmers Protests 2.0 : मर्सिडीज कार आणि मॉडिफिकेशन केलेले ट्रॅक्टर वापरणारे शेतकरी गरीब? सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थितीत (Watch Video)

'ए मेरे वतन के लोगों' सारखी गाणी ऐकून ब्रेन स्ट्रोकवर केले जाणार उपचार? AIIMS ची नवी म्युझिक थेरपी असे करणार काम