सार
मॉडिफिकेशन केलेले ट्रॅक्टर आणि मर्सिडीज-बेंझ जी-वॅगनसारख्या आलिशान कारमधून शेतकरी आंदोलनासाठी उतरले आहेत. यावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.
Farmers Protests 2.0 : शेतकऱ्यांकडून 'दिल्ली चलो' आंदोलनाची हाक आजपासून (13 फेब्रुवारी) दिली आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. पण आंदोलनात सहभागी होण्यासाठी चक्क मॉडिफाय केलेले ट्रॅक्टर आणि मर्सिडीज-बेंझ जी-वॅगनसारख्या आलिशान कारचा वापर केल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. खरंतर सोमवारी केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा (MSP) तयार करण्यासह अन्य काही मागण्या केल्या आहेत.
वर्ष 2020 मध्ये शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली होती. पण यंदाच्यावेळी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. राज्याच्या सीमारेषांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्त्यांवर खिळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. दिल्लीत संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे.
अशातच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आंदोलनकर्ते आलिशान कार आणि मॉडिफाय केलेले ट्रॅक्टर घेऊन निघाल्याचे दिसून येत आहे. यावरच नेटकऱ्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. नेटकऱ्यांनी म्हटले की, गरीब शेतकरी असे असतात का? (सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ Asianet News स्वातंत्र्यपणे पडताळणी करू शकत नाही.)
आणखी वाचा :