पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण, विश्व हिंदू परिषदेने केली ममता बॅनर्जींनी माफी मागण्याची मागणी (Watch Video)

| Published : Jan 13 2024, 07:07 PM IST / Updated: Jan 13 2024, 10:36 PM IST

Sadhus Attack in West Bengal
पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण, विश्व हिंदू परिषदेने केली ममता बॅनर्जींनी माफी मागण्याची मागणी (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात तीन साधूंना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे विश्व हिंदू परिषदेने ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.

Sadhus Beaten Purulia : पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये साधूंवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भाजप (BJP) पक्षाने तृणमूल काँग्रेसवर (All India Trinamool Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे सह सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन (Dr. Surendra Jain) यांनी म्हटले की, “ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हिंदू समूदायाची माफी मागावी.तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ज्याप्रकारे साधू-संतांवर हल्ला केलाय त्याचा कधीच स्विकार केला जाणार नाही” 

डॉ. सुरेंद्र जैन यांनी पुढे म्हटले की, “गंगासागर येथे जाणाऱ्या साधूंवर तृणमूलच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. पश्चिम बंगालच्या धरतीवर देवी कालीचा वास आहे. याशिवाय स्वामी विवेकानंद ते काही आध्यात्मिक गुरुंचा प्रभावही पश्चिम बंगालच्या धरतीवर राहिला आहे. त्याच बंगालच्या धरतीवर ममता बॅनर्जींनी काही मुस्लिम मतांसाठी ज्याप्रकारे हिंदू विरोधी वातावरण निर्माण केलेय ते अत्यंत दुर्दैवी आहे. काली मातेचे मंडप पाडले जातात, मूर्तींचे अपमान केले जाते. हिंदू कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय. यामुळे ममता बॅनर्जींच्या या अत्याचाराला देशातील जनता कोणत्याही स्थितीत स्विकार करणार नाही.”

साधूंना मारहाण
रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशात राहणारे तीन साधू मकर संक्रांतीनिमित्त स्नान करण्यासाठी गंगासागर येथे जात होते. यादरम्यान पुरुलियामधील जमावाने साधूंना चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी साधूंनी घटनास्थळावरुन जीव वाचवण्यासाठी पळ काढला.

पोलिसांनी म्हटले की, तीन साधू भाड्याच्या गाडीने जात असताना ते रस्ता विसरले. यानंतर पुरुलियामध्ये साधूंनी स्थानिक मुलींना रस्ता विचारला असता त्या ओरडत पळाल्या. यामुळे साधूंनी मुलींना त्रास दिल्याचे स्थानिकांना वाटले आणि त्यांना मारहाण केली. इंटरनेटवर साधूंना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : 

घरबसल्या मिळणार राम मंदिराचा प्रसाद, जाणून घ्या ऑर्डरची प्रक्रिया

22 जानेवारीला अयोध्येत जाण्याचा विचार करताय? आधी हे वाचा

नाशिकमधील रोड शो ते काळाराम मंदिरापर्यंत, पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास PHOTO