1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर

| Published : Apr 01 2024, 08:26 AM IST / Updated: Apr 01 2024, 09:34 AM IST

LPG Gas Cylinder  News

सार

आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरू झाली आहे. याच्याच पहिल्या दिवशी एलपीजी गॅस किंमतीत फार मोठी घट झाली आहे.

LPG Gas Cylinder Price : देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशातच एलपीजी गॅसच्या किंमतीत फार मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. दरम्यान, गॅसच्या किंमतीत घट केवळ कमर्शिअल गॅस सिलेंडरवरच केली आहे. 19 किलोग्रॅम वजनाचा एलपीजी सिलेंडर 32 रूपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. आजपासून (1 एप्रिल) नवे दर लागू करण्यात आले आहेत.

दिल्ली ते कोलकाता येथील एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर
1 एप्रिल पासून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. अशातच 19 किलोग्रॅमचा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 30.50 रुपयांनी घट होत 1764.50 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 32 रुपयांनी किंमती कमी झाल्याने 1879 रुपये नवे दर एलपीजी गॅल सिलेंडरसाठी असणार आहेत. मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 31.50 रुपयांची घट होत 1717.50 रुपये, चेन्नईत 30.50 रुपयांची घट होण्यासह 1930 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील 19 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅसचे नवे दर

  • दिल्ली - 1764.50 रुपये
  • कोलकाता - 1879.00 रुपये
  • मुंबई - 1717.50 रुपये
  • चेन्नई - 1930.00 रुपये

IOCL च्या वेबसाइटनुसार, एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर 1 एप्रिल पासून लागू करण्यात आले आहेत. याआधी 1 मार्चला दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1795 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईत 1960.50 रुपये मोजावे लागत होते.

महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट
याआधी केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त गृहिणींना दिलासा दिला होता. त्यावेळी 14 किलोग्रॅम असणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची घट करण्यात आली होती. सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरसाठी 803 रुपये, कोलकाता येथे 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपये मोजावे लागत आहेत. 

आणखी वाचा : 

पासपोर्ट मिळवणारा राजस्थानचा पहिला ट्रान्सजेंडर कोण? त्याने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत केले काम

Video : ट्रॅफिकमध्ये UPSC परीक्षेचा व्हिडीओ पाहणारा झोमॅटो बॉय झाला व्हायरल, इंटरनेटवर होत आहे कौतुक

तुम्हाला दूरसंचार मंत्रालयाकडून कॉल येत आहेत का? या कॉलची तक्रार कशी कराल?