सार

निवडणूक रोख्यांचा मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापले गेले आहे. याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक रोख्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांबद्दल (Electoral Bonds) स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank Of India) अनेकदा सुनावले आहे. याशिवाय निवडणूक आयोगाला निवडणूक (Election Commission) रोख्यांची माहिती मिळवण्यास सांगण्यात आले आहे. 

निवडणूक रोख्यांबद्दल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. एका मुलाखतीत पंतप्रधानांना निवडणूक रोख्यांबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी त्याची उत्तरे दिलीच. पण विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोलही केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, निवडणूक रोख्यांचा विरोध करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होणार आहे. खरंतर, हे विधान पंतप्रधानांनी तमिळनाडूतील थांती टेलिव्हिजनला दिलेल्या एका मुलाखातीत केले आहे.

निवडणूक रोख्यांच्या गरजेवर पंतप्रधानांनी दिले उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, वर्ष 2014 आधी जेवढ्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये राजकीय पक्षांनी खर्च केला असल्यास एखाद्या एजेंसीने सांगावे पक्षाकडे कोठून पैसा आला, किती खर्च झाला. खरंतर, मोदींनी निवडणूक रोखे तयार केले असता सर्वांनाच कळतेय की, राजकीय पक्षांकडे कोठून पैसा आला, कोणी दिला आणि कोणाला दिला. अन्यथा कोणाला काहीही कळले नसते. आज तुम्हाला ट्रेल मिळतायत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, कोणतीही व्यवस्था संपूर्ण व्यवस्थित असेल असे नाही. त्यामध्येही काही उणिवा असू शकतात. याच उणिवा सुधारल्या जाऊ शकतात. निवडणूक रोखे असते तर कळले असते पैसे नक्की कोठे गेलेत.

ईडी स्वतंत्र रुपात काम करतेय
ईडीसंबंधित (ED) पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला गेला. यावर पंतप्रधानांनी उत्तर देत म्हटले की, ईडी आमचे सरकार आल्यानंतर तयार झालीय का ? पीएमएलए कायदा आम्ही तयार केलाय. ईडी स्वतंत्र आहे, त्यांच्यावर आमचे नियंत्रण नाही. ईडी स्वतंत्र रुपात काम करते. ईडीकडे 7 हजार प्रकरणे आहेत. याशिवाय तीन टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणे अशी आहेत जी राजकरणाशी संबंधित आहेत. ईडीने 35 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. एजेंसीचे ऑपरेशन लीक होत नाही. रोख रक्कम सातत्याने जप्त केली जातेय.

काँग्रेसने वरिष्ठांचा सल्ला ऐकावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, काही ठिकाणी वॉशिंग मशीनमधून पैसे जप्त केले. काही ठिकाणी पाईपमध्ये जप्त होते. कांग्रेसच्या खासदारांकडून 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. बंगालमध्ये मंत्र्यांच्या घरी नोटांचे बंडल मिळत आहेत. जोवर आणखी एखादी एजेंसी गुन्हा दाखल करत नाही तोवर ईडी कारवाई करू शकत नाही. याशिवाय कांग्रेसने पक्षातील वरिष्ठांचे ऐकण्यास सुरूवात करावी. जेणेकरून त्यांच्यासह पक्षाचेही भलं होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट ; जाणून घ्या दिल्ली, मुंबईसह तुमच्या शहरातील दर

राजस्थानमधील छोट्या गावातल्या मुलीला 6 महिन्यात तीन सरकारी नोकऱ्या मिळाल्या, आता परत ती CGST मध्ये झाली इन्स्पेक्टर

भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केला मोठा आरोप, काँग्रेसने देशाची फाळणी करून श्रीलंकेला कचाथीउ दिला