सार

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच आता रामलला आपल्या प्राणप्रतिष्ठेवेळी आपल्या भक्ताने शिवलेले वस्र परिधान करणार आहेत.

Ram Mandir : राम मंदिराच्या सोहळ्यावेळी रामलला हे पिवळ्या रंगाचे वस्र परिधान करणार आहेत. मध्य प्रदेशातील प्रमोदवन येथे राहणारे शंकर लाल हे रामललांसाठी वस्र तयार करत आहेत. शंकर लाल यांचा परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून रामललांसाठी वस्र शिवतो.

1985 पासून परिवार रामललांसाठी शिवतो वस्र
शंकर लाल यांच्यानुसार, त्यांचा परिवार वर्ष 1985 पासून रामललांसाठी वस्र शिवतो. त्यावेळी मंदिराचे पुजारी लालदास यांच्या माध्यमातून शंकर लाल यांचे वडील बाबू लाल यांना दोन शिवणकामाच्या मशीन मिळाल्या होत्या. परिसराच्या आसपासच बाबू लाल आणि त्यांचा मोठा भाऊ भगवत प्रसाद हे वस्र शिवण्याचे काम करायचे. वर्ष 1992 पर्यंत ते तेथेच वस्र शिवत होते.

पण बाबरी मशीदीच्या विध्वंसानंतर शिवणकामाचे दुकान प्रमोदवन येथे सुरू करण्यात आले. बाबरी मशीद पाडल्यानंतर रामलला हे एका टेंटमध्ये विराजमान झाले. त्यावेळीही शंकर लाल यांचे वडील रामललांसाठी कपडे शिवण्याचे काम करायचे. वर्ष 1994 मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शंकर लाल यांचा भाऊ भगवत प्रसाद यांनी शिवणकाम तसेच पुढे सुरू ठेवले.

शुभ कामावेळी पिवळे वस्र परिधान करण्याची प्रथा
शंकर लाल यांच्या मते, रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तयार करण्यात येणाऱ्या 51 इंचाच्या मूर्तिसाठी वस्र तयार करायचे होते. यासाठी मंदिराच्या ट्रस्टने मोठ्या भावाला बोलावले होते.

सोमवारी रामललांना पांढऱ्या रंगाचे वस्र परिधान केले जाते. पण शुभ कामावेळी पिवळ्या रंगाचे वस्र परिधान करण्याची प्रथा आहे. यामुळे 22 जानेवारीला (2024) होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेवेळी रामललांना पिवळ्या रंगाचे वस्र परिधान केले जाणार असल्याचे शंकर लाल यांनी सांगितले.

प्रत्येक दिवशीचे वस्र असते खास

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रामललांना प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्र परिधान केले जाते.

  • सोमवार- पांढऱ्या रंगाचे वस्र
  • मंगळवार- लाल रंगाचे वस्र
  • बुधवार- हिरव्या रंगाचे वस्र
  • गुरूवार- पिवळ्या रंगाचे वस्र
  • शुक्रवार- क्रीम रंगाचे वस्र
  • शनिवार- निळ्या रंगाचे वस्र

आणखी वाचा: 

Ayodhya : राम मंदिराचे खास फोटो, रात्रीचा नजारा पाहून मन होईल प्रसन्न

Makrana Marble : राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या दगडाची किंमत माहितीये?

AYODHYA राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तूप कुठून मागवले जाते?