अयोध्येच्या राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तुपाचा पुरवठा कुठून केला जातो?
अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यापासूनच मंदिरात अखंड ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे.
राम मंदिरातील अखंड ज्योत कोण तेवत ठेवते तसेच यासाठी कोणत्या तुपाचा वापर केला जातो? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
अयोध्येच्या राम मंदिरात बिहारमधील महावीर मंदिर ट्रस्टतर्फे अखंड ज्योत तेवत ठेवली जात आहे.
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी विशेषतः कर्नाटक राज्यातून देशी गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप मागवले जाते.
महावीर मंदिर ट्रस्टतर्फे राम मंदिरात अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी चेन्नई शहरातून खास दोन स्टँड तयार करून घेण्यात आले आहेत. या स्टँडवर अखंड ज्योत तेवत ठेवली जाते.
नवीन राम मंदिरातही अखंड ज्योतीसाठी याच स्टँडचा वापर केला जाणार आहे. मंदिराबाहेर हे स्टँड्स लावण्यात येतील.
राम मंदिराचा निकाल जाहीर केल्यानंतर महावीर मंदिरातर्फे अखंड ज्योतीसाठी 5 वर्षे वापरले जाईल इतक्या प्रमाणात तूप पुरवले गेले. दिवसभरात एका स्टँडसाठी जवळपास 1 किलो तूप वापरले जाते.
महावीर मंदिर समितीचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांच्या माहितीनुसार, सुरुवातीस मंदिरातील अखंड ज्योतीसाठी तुपाचे 75 डबे पाठवले गेले. मंदिराकडून मागणी होताच पुन्हा तूप पुरवले जाते.