अयोध्येतील राम मंदिराचे खास फोटो, रात्रीचा नजारा पाहून मन होईल प्रसन्न
अयोध्येत येत्या 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारीही सुरू करण्यात आली आहे.
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अशातच आता मंदिराचे काही खास फोटो समोर आले आहेत.
रात्रीच्या वेळेस राम मंदिराचा अद्भूत नजारा दिसतो. हा नजारा पाहून तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.
रात्रीच्या वेळी राम मंदिराचे दृश्य पाहाण्यासारखे आहे. अशातच मंदिराचे काही अलौकिक फोटो समोर आले असून भाविक रामलल्लांच्या दर्शनासाठी आता वाट पाहात आहेत.
राम मंदिराची झलक कधी पाहायला मिळणार याची भाविकांना उत्सुकता लागून राहिली आहे. याशिवाय रामलल्लांचे दर्शन घेण्याची इच्छा वेळोवेळी भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.
रामलल्लांच्या नव्या मंदिरासाठी भाविकांना फार मोठी प्रतीक्षा करावी लागली. आता 500 वर्षांनंतर रामलल्लांच्या मंदिराचे स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे.
अयोध्येत एण्ट्री केल्यानंतर तुम्हाला श्रीराम जन्मभूमीत प्रवेश करत असल्याचा अनुभव येईल. हे मंदिर त्रेतायुगाची आठवण करून देते.