- Home
- India
- Ram Mandir Pran Pratishtha : श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान, अभिजित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
Ram Mandir Pran Pratishtha : श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान, अभिजित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
- FB
- TW
- Linkdin
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान झाले आहेत. अभिजित मुहूर्तावर श्री रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा विधीच्या वेळेस मंदिराच्या गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) हेलिकॉप्टरमधून श्री रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली.
VIDEO : श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान, भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून मंदिरावर केली पुष्पवृष्टी #AyodhyaRamMandir #Ayodhya #RamMandirPranPrathistha #RamMandir #PranPratishthaRamMandir #RamLallaVirajman #राममंदिरप्राणप्रतिष्ठा @ShriRamTeerth pic.twitter.com/fGZ2dusCe1
— Asianet News Marathi (@AsianetNewsMH) January 22, 2024
रामलला यांचे दर्शन घ्या!
देशातील नागरिकांची 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहामध्ये 84 सेकंदांच्या शुभ मुहुर्तामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारांच्या गजरात, धार्मिक विधी, भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर रामलला यांची पहिली झलक समोर आली आहे.
रामललांचे सुंदर डोळे, चेहऱ्यावरील गोड हास्य आणि तेज एकूणच त्यांचे भव्यदिव्य रूप मंत्रमुग्ध करणारे आहे. रामलला यांचे प्रथम दर्शन मिळाल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणत आहे की, कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी अतिशय सुंदर मूर्ती साकारली आहे.
Shri Ram has finally arrived!
Here is a glimpse of Ram Lalla Idol
Live link - https://t.co/6fpEKwg4dE#AyodhaRamMandir #RamMandirPranPratishta #ayodhya pic.twitter.com/5QiiluKhBy— DD News (@DDNewslive) January 22, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पहिली आरती देखील केली. आरती संपन्न झाल्यानंतर शंखनाद करण्यात आला. सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल यांनीही आरती केली.
#WATCH | Hundreds of years of waiting finally ended
Here are the first visuals of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya
Live link - https://t.co/6fpEKwg4dE#AyodhaRamMandir #RamMandirPranPratishta #ayodhya pic.twitter.com/FbpLQtqM6d— DD News (@DDNewslive) January 22, 2024
श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. प्रमुख यजमान म्हणून पंतप्रधान मोदींनी यावेळेस संकल्पासह पूजा केला. यावेळेस पंतप्रधानांच्या शेजारी सरसंघचालक मोहन भागवत देखील बसले होते.
#WATCH | The wait is finally over, and Ram Lalla is here
Ram Lalla Pran Pratishtha ceremony at Shri Ram Janmaboomi Mandir concludes.
Live link - https://t.co/6fpEKwg4dE#AyodhaRamMandir #RamMandirPranPratishta #ayodhya pic.twitter.com/FDIhFtbojW— DD News (@DDNewslive) January 22, 2024
रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी 12.20 वाजता सुरू झाला आणि दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पूजाविधी संपन्न झाल्या.
Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya#AyodhaRamMandir #RamMandirPranPratishta #ayodhya pic.twitter.com/bYWJctoRbR
— DD News (@DDNewslive) January 22, 2024
मंदिरामध्ये दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “अयोध्या धाममध्ये श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचे अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारे आहेत. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणे हे माझे भाग्य आहे. जय सियाराम!”
अयोध्या धाम में श्री राम लला की प्राण-प्रतिष्ठा का अलौकिक क्षण हर किसी को भाव-विभोर करने वाला है। इस दिव्य कार्यक्रम का हिस्सा बनना मेरा परम सौभाग्य है। जय सियाराम! https://t.co/GAuJXuB63A
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पूजेचे साहित्य घेऊन मंदिराच्या गर्भगृहामध्ये दाखल झाले होते. या सोहळ्याच्या पूजाविधीसाठी त्यांनी कुर्ता आणि धोतर असा खास पोशाख परिधान केला होता.
Glimpses of Prime Minister @narendramodi entering temple premises at Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya to lead the rituals for the Pranpratishtha ceremony.@PMOIndia #AyodhaRamMandir #RamMandirPranPratishta #ayodhya pic.twitter.com/wKXfkajjJd
— DD News (@DDNewslive) January 22, 2024
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी VVIP पाहुणे अयोध्येमध्ये दाखल
रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-परदेशातील व्हीव्हीआयपी पाहुणे अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांसह कित्येक सेलिब्रिटी, सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत.