- Home
- lifestyle
- 22 January 2024 Horoscope : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल? जाणून घ्या सविस्तर
22 January 2024 Horoscope : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल? जाणून घ्या सविस्तर
- FB
- TW
- Linkdin
RASHI BHAVISHYA
22 January 2024 Rashi Bhavishya : अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ एकच नव्हे तर अनेक शुभ योग जुळून आल्याने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
शुभ योग
22 जानेवारी या दिवशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे, ज्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत. या सोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी आणि रवि योगही आहेत. मृगाशिरा नक्षत्रामुळे हा दिवस अधिक शुभ ठरला आहे, याच नक्षत्रामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.
कसा आहे तुमचा दिवस?
या दिवशी चंद्र देखील वृषभ राशीमध्ये आहे. विशेष म्हणजे तब्बल 41 वर्षांनंतर 22 जानेवारी 2024 रोजी (22 January 2024 Horoscope) विष्णू मुहूर्ताचा शुभ आणि महत्त्वपूर्ण योग जुळून आला आहे. प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया 22 जानेवारी या दिवशी असणारे शुभ योग आणि याचा 12 राशींवर काय परिणाम होऊ शकतो? याबाबतची सविस्तर माहिती…
मेष रास
22 जानेवारीला असणारे शुभ योग या राशीच्या लोकांच्या जीवनातील सुख-समृद्धी वाढवतील. या दिवशी एखादे मोठे यशही मिळू शकते. या राशीचे लोक जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत आहेत, त्यांना या दिवशी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती पूर्णपणे अनुकूल परिणाम देणारी असेल.
वृषभ रास
22 जानेवारीला या राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये मोठे यश मिळण्याचे योग जुळून आले आहेत. या राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित अनेक चांगल्या संधीही मिळतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीमातेचा विशेष आशीर्वाद मिळणार असल्याचेही दिसत आहे.
मिथुन रास
या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्याकडे ओढ वाढू शकते. यामुळे ते दानधर्म यासारख्या कामांमध्ये सहभागी होतील. ही माणसे कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असोत, त्यांना 22 जानेवारीला मनाप्रमाणे यश मिळेल. या दिवशी नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.
कर्क रास
22 जानेवारीला शुभ योग जुळून येत असल्याने कर्क राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायामध्ये लाभ मिळतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्येही सुधारणा होईल.
सिंह रास
या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होईल. बिघडलेले नातेसंबंध सुधारतील. कौटुंबिक जीवन देखील खूप चांगले असेल. सामाजिक ओळखी वाढतील. नवीन लोकांशी नातेसंबंध निर्माण होतील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये आर्थिक योग जुळून येण्याची शक्यता आहे.
कन्या रास
या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. शुभ योग जुळून आल्याने हे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकतात. या लोकांच्या प्रकृतीतही बरीच सुधारणा होऊ शकते. भाऊ-बहिणींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यातही आवड वाढेल.
तूळ रास
22 जानेवारी 2024 हा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप आनंदाचे क्षण घेऊन येणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या करिअरमध्ये आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येतील. हा दिवस या लोकांसाठी खूप भाग्यशाली असणार आहे. धनलाभासोबतच मान-सन्मानामध्ये वाढ होण्याचे योग जुळून येण्याची शक्यता आहे.
(Ram Lalla Murti : श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची पहिली झलक)
वृश्चिक रास
22 जानेवारीला या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यांचा बँक बॅलन्सही वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संवाद कौशल्याने लोक प्रभावित होऊ शकतात. नातेसंबंधामध्ये गोडवाही निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
धनु रास
22 जानेवारीला शुभ योग जुळून येत असल्याने या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात खूप सुधारणा होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये करत असलेल्या व्यवसायात लाभ मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. तरुण आणि विद्यार्थ्यांसाठीही हा दिवस शुभ असेल. वेळेचा पुरेपूर वापर करून या दिवशी मोठे यश मिळवता येऊ शकते.
(Ram Mandir Ayodhya : श्री रामाचे हे 11 मंत्र करू शकतात प्रत्येक दुःख दूर, 22 जानेवारीला करा जप)
मकर रास
22 जानेवारी हा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली असणार आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे त्यांना व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. जुन्या समस्या संपतील आणि जीवनात आनंद येईल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमाचंही आयोजन होऊ शकते. मुलांकडून सुख-आनंद मिळेल.
कुंभ रास
22 जानेवारी हा दिवस या राशीच्या मोठ्या उद्योगपतींसाठी अतिशय शुभ असणार आहे. त्यांना मोठा फायदा होऊ शकतो, तर छोट्या व्यापाऱ्यांनाही कर्जमुक्ती मिळू शकते. गुंतवणुकीसाठीही हा दिवस अतिशय शुभ असेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. आरोग्यही चांगले राहील. तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते.
(Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य व उपासनेचे महत्त्व, जाणून घ्या सविस्तर)
मीन रास
22 जानेवारीला या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. त्यांनी कोणतेही काम हाती घेतले तरी त्यामध्ये त्यांना यश मिळेल. त्यांच्या भौतिक सुखामध्येही वाढ होईल. करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. या राशीचे लोक या दिवशी नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकतात.
DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.