सार
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता अयोध्या नगरीमध्ये दाखल होणार आहेत.
Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येमध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देश-परदेशातील 7 हजारांहून अधिक पाहुणेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता अयोध्येमध्ये दाखल होतील आणि दुपारी 3.05 वाजता दिल्लीकडे रवाना होतील. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर ते अयोध्येतील शिव मंदिरामध्ये पूजापठणही करतील. तसेच अयोध्येमध्ये जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजचे वेळापत्रक
- 9.05 वाजता: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विमानतळाहून अयोध्येकडे रवाना होतील
- 10.30 वाजता: पंतप्रधान मोदी अयोध्या विमानतळावर पोहोचतील
- 10.55 वाजता: पंतप्रधान मोदी श्री राम जन्मभूमी मंदिरामध्ये पोहोचतील
- 12.20 वाजता: श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानास सुरुवात करण्यात येईल
- 12.29 वाजता: प्राणप्रतिष्ठेचे अंतिम अनुष्ठान करण्यात येईल
- 12.55 वाजता: पंतप्रधान मोदी पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील
- 1.15 वाजता: पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी जाहीर सभांना संबोधित करतील
- 2.10 वाजता: पंतप्रधान मोदी कुबेरटीला शिव मंदिराचे दर्शन घेतील
- 2.35 वाजता: पंतप्रधान मोदी हेलीपॅडवर दाखल होतील
- 3.05 वाजता: पंतप्रधान मोदी अयोध्येहून दिल्लीकडे रवाना होतील
- 4.25 वाजता: पंतप्रधान मोदी दिल्ली विमानतळावर पोहोचतील
रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा: 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त
अयोध्येतील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे. दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 08 सेकंद ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदांदरम्यान प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होईल. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
आणखी वाचा :
Ayodhya Ram Mandir Video: रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पाहा अयोध्येतील राम मंदिराची झलक