YouTube वर सर्वाधिक पाहिले गेले राम मंदिराचे लाइव्ह प्रक्षेपण, मिळाले ऐवढे व्हूज

| Published : Jan 23 2024, 11:49 AM IST / Updated: Jan 23 2024, 11:54 AM IST

Ram Mandir Photo

सार

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे युट्युबवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण युट्युवर सर्वाधिक पाहिला गेल्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.

Ram Mandir Pran Prathistha : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे टेलिव्हिजन ते सोशल मीडियावर लाइव्ह प्रक्षेपण लाखो नागरिकांनी पाहिले. याशिवाय राम मंदिर सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण युट्युबवरही (YouTube) दाखवण्यात आले. या लाइव्ह प्रक्षेपणाला 19 दशलक्ष नागरिकांनी पाहिल्याचे समोर आले आहे. याशिवाय युट्युबवरील लाइव्ह प्रक्षेपण पाहिल्याचा ग्लोबल रेकॉर्डही झाला आहे.

प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे दोन व्हिडीओ ‘PM Modi LIVE | Ayodhya Ram Mandir LIVE | Shri Ram Lalla Pran Pratishtha’ आणि ‘Shri Ram Lalla Pran Pratishtha LIVE' नावाने लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत युट्युब चॅनलवरील लाइव्ह प्रक्षेपणला क्रमश: 10 दशलक्ष आणि 9 दशलक्षांपेक्षा अधिक व्हूज मिळाले. या लाइव्ह प्रक्षेपणाने चंद्रयान-3 लाँच, फिफा वर्ल्ड कप 2023 आणि अ‍ॅपल लाँच इव्हेंटच्या लाइव्ह प्रक्षेपणाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

चंद्रयान-3 लॅण्डिंगच्या लाइव्ह प्रक्षेपणाला मिळाले होते 8.09 दशलक्ष व्हूज
गेल्या वर्षात 23 ऑगस्ट 2023 रोजी Chandrayaan 3 landing च्या व्हिडीओला 8.09 दशलक्ष लाइव्ह व्हूज मिळाले होते. याशिवाय 9 डिसेंबर 2022 रोजी CazéTV द्वारे World Cup 2022 QF Brazil vs Croatia चे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते त्याला 6.14 दशलक्ष लाइव्ह व्हूज मिळाले होते.

यावेळी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनलवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आलेल्या PM Modi LIVE | Ayodhya Ram Mandir LIVE व्हिडीओला 10 दशलक्ष लाइव्ह व्हूज मिळाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या युट्यूबवर 2 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत युट्युब चॅनलवर 23 हजार 750 व्हिडीओ आणि 472 कोटी व्हूजसह 2.1 कोटी सब्सक्राइबर्स आहेत. युट्युबवर सर्वाधिक सब्सक्राइबर्स असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो (Jair Bolsonaro) आहेत. त्यांचे 64 लाख युट्युब सब्सक्राइबर्स आहेत.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : 'देव ते देश आणि राम ते राष्ट्रापर्यंत भक्ती असावी', पाहा नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी या दिग्गजांनी लावली उपस्थिती, पाहा Photos

रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा