रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा
22 जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच रामललांच्या श्रृंगारासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे वस्र त्यांना परिधान केले जाणार आहेत.
19 जानेवारीला शुक्रवारी अयोध्येत दाखल झालेल्या रामललांचा श्रृंगार क्रिम कलरने करण्यात आला होता. रामललांचा श्रृंगार प्रत्येक दिवशी खास रंगातील वस्रामध्ये केला जातो.
रामललांना सोमवारी पांढऱ्या रंगातील वस्रांमध्ये श्रृंगार करण्यात येतो. खरंतर सोमवार हा चंद्राचा दिवस असल्याने रामललांनाही त्याच रंगातील वस्र परिधान केले जाते.
ज्योतिष शास्रानुसार, मंगळवारचा स्वामी मंगळ असल्याने त्यांना लाल रंग समर्पित आहे. यामुळे रामललांना मंगळवारी लाल रंगातील वस्राने श्रृंगार केला जाणार आहे.
ज्योतिष शास्रानुसार, बुधावरचा स्वामी बुधदेव आहे. बुधदेवांना हिरवा रंग समर्पित असल्याने रामललांनाही बुधवारी हिरव्या रंगातील वस्राने श्रृंगार केला जातो.
गुरुवारचा स्वामी गुरु असल्याने त्यांना पिवळा रंग समर्पित आहे. यामुळे प्रत्येक गुरुवारी रामललांना पिवळ्या रंगातील वस्र परिधान केले जाते.
शुक्रवारचा स्वामी शुक्रदेव असल्याने त्यांना क्रिम कलर समर्पित आहे. यामुळे रामललांनाही शुक्रवारी क्रिम कलरमधील वस्राने श्रृंगार केला जातो.
ज्योतिष शास्रानुसार, शनिवारचा स्वामी शनिदेव असल्याने त्यांना निळा रंग समर्पित आहे. यामुळे प्रत्येक शनिवारी रामललांचा श्रृंगार निळ्या रंगातील वस्रांमध्ये केला जातो.
ज्योतिष शास्रानुसार, रविवारच्या स्वामी सूर्यदेव असून त्यांना गुलाबी रंग प्रिय आहे. यामुळे प्रत्येक रविवारी रामललांना गुलाबी रंगातील वस्रांनी श्रृंगार केला जातो.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.