सार

Ram Mandir Ceremony : येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनचा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणाऱ्या भाविकांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या साधुसंतांसह भाविकांना राहण्यासाठी टेंट सिटी (Tent City) देखील उभारण्यात आली आहे. कडेकोड सुरक्षिततेमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्हीव्हीआयपी लोक, साधुसंतांसह सर्वसामान्य भाविकही उपस्थितीत राहणार आहेत. याच दरम्यान, आता सर्वसामान्य भाविकांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत.

राम मंदिराच्या दर्शनासाठी प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. या प्रवेशद्वाराजवळ राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्राकडून मोफत लॉकरची व्यवस्था भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण रामललांच्या दर्शासाठी जाणार असाल तर काय घेऊन जाऊ शकता आणि काय नाही, याबद्दलच जाणून घेऊया अधिक...

भाविकांसाठी दर्शन

  • मंदिर ट्रस्टकडून हे सांगण्यात आले आहे की, लॉकरमध्ये भाविक आपले सामान ठेवू शकतात. सामान ठेवल्यानंतर त्या लॉकरची पावती आणि किल्ली मिळाल्यानंतर दर्शनासाठी जाता येईल.
  • भाविकांना दर्शनावेळी आपल्यासोबत मोबाइल, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक सामान अशा वस्तू नेण्यास परवानगी नाही.
  • मंदिरात प्रवेशापूर्वी भाविकांकडील सामानाची तपासणी केली जाणार आहे.
  • सामानाच्या तपासणीवेळी एखादे बंदी असलेले (Prohibited) सामान आढळल्यास भाविकाला दर्शनासाठी परवानगी नाकारली जाईल.
  • हिवाळ्याचे दिवस असल्याने ऊबदार कपडे भाविक घालू शकतात.

रामललांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी खास सुविधा
सुविधा केंद्राजवळ लावण्यात आलेल्या पोस्टरच्या माध्यमातून भाविकांना रामललांच्या तीन वेळच्या आरतीच्या पासाबद्दल माहिती मिळणार आहे. तेथेच दानपेटी, होमिओपॅथिक उपचार केंद्र देखील असणार आहे. दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही येथील डॉक्टरांना संपर्क करू शकता.

मंदिरात सकाळी सात ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दर्शन करता येणार आहे. दिव्यांगांना मोफत व्हीलचेअरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना दर्शन कधी?
अयोध्या जिल्हा प्रशासनानुसार, 22 जानेवारी (2024) रोजी मंदिराच्या प्रांगणात दुपारी दोन वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील. यामुळे सर्वसामान्यांना 22 जानेवारीला दर्शन करू शकता. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामुळे 20 जानेवारीपासून पुढील तीन दिवस सर्वसामान्यच नव्हे तर खास लोकांना देखील रामलला यांचे दर्शन करता येणारनाही.

22 जानेवारीला केवळ आमंत्रित लोकांनाच रामललांचे दर्शन करता येणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांतर्गत 15 ते 24 जानेवारी दरम्यान विशेष विधी करण्यात येणार आहेत. म्हणजेच सर्वसामान्यांसाठी मंदिराचे दरवाजे 25 जानेवारी (2024) नंतर खुले होणार आहेत. पण भाविकांना दर्शनावेळी सोबत ओखळपत्र घेऊन यावे लागणार आहे.

सामूहिक रूपात उत्सव साजरा करण्याचे आवाहन

श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी लोकांना प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्या गावात, परिसरात अथवा मंदिराच्या आसपास उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय रामभक्तांनी एकत्रित येऊन भजन-किर्तन करावे हे देखील त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा: 

Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांना Google रामनगरीत पोहोचवण्याचे करणार काम

AYODHYA RAM MANDIR : राम मंदिरासाठी या पुजाऱ्यांची झाली निवड

Ayodhya Ground Report : अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी उभारली Tent City, जाणून घ्या खास गोष्टी