सार
Ayodhya Ground Report : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमापूर्वी एशियानेट न्यूजची टीम (Asianet News Hindi) अयोध्येत पोहोचली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास तयारी करण्यात आली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्येत येत्या 22 जानेवारीला (2024) रामलला (Ram Lala) यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) यांच्याकडून 4 हजार साधुसंतांसह 7 हजार लोकांना कार्यक्रमासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. भगवान राम यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे. अशातच पाहुण्यांसाठी काय खास आयोजन करण्यात आले आहे याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या लोकांसाठी तीन ठिकाणी म्हणजेच उत्तर प्रदेशातील कारसेवकपूरम, मणिराम दास छावणी आणि बाग बिजेसी येथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचसोबत भाविकांसाठी ब्रह्मकुंड गुरुद्वारा, शरयू तट आणि गुप्तार घाटाजवळ टेंट सिटी (Tent City) तयार करण्यात आली आहे.
अयोध्येत उभारली टेंट सिटी
राम मंदिरापासून 600 मीटर दूर अंतरावर अससेल्या ब्रम्हकुंड गुरुद्वाराजवळ टेंट सिटी उभारण्यात आली आहे. या सिटीमध्ये भगवान राम यांच्या पादुका ठेवण्यात आल्या असून भव्य रोषणाई देखील करण्यात आली आहे. टेंट सिटीची निर्मिती करणाऱ्या प्रवेग कंपनीचे कर्मचारी नितिन यांनी याबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, सिटीमध्ये अयोध्येची सांस्कृतिक झलक दाखवण्यात आली आहे. एण्ट्री गेट ते टेंट पर्यंत आलिशान खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये आधुनिक सोयीसुविधांची देखील सोय करण्यात आली आहे.
10 वर्षे भाडेतत्त्वावर घेतलीय जमीन
नितिन पुढे म्हणतात, टेंट सिटी जवळजवळ आठ हजार चौरस मीटरमध्ये पसरली आहे. याशिवाय ही जमीन 10 वर्षे भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरही ही सिटी तशीच राहणार आहे.
सरयू तटावर उभारलेत आलिशान टेंट
- रामकथा संग्रहालयामागील बाजूस शरयू तटाच्या किनाऱ्यावर एका टेंट सिटीची निर्मिती करण्यात आली आहे.
- या सिटीमध्ये 35 आलिशान टेंट उभारण्यात आले असून त्यामध्ये हॉटेलप्रमाणे सुविधा दिल्या गेल्या आहेत.
- या आलिशान टेंटसाठी 15 डिसेंबर (2023) पासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार आहे.
- टेंटसाठी कोणतीही व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने खोलीसाठी बुकिंग करू शकते.
बुकिंगचा खर्च किती?
ब्रम्हकुंड टेंट सिटीमध्ये नऊ हजार रुपये एका रात्रीचे खोलीचे भाडे असणार आहे. या खोलीत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जसे की, ड्रेंसिंग टेबल ते सिक्युरिटी लॉकर इत्यादी. गुप्तार घाट येथे देखील टेंट सिटी उभारली जात आहे. गुप्तार घाटाजवळील टेंट सिटी मंदिरापासून 11 किलोमीटर दूर अंतरावर आहे.
साधुसंतांसाठी खास सोय
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराजवळ कारसेवकपूरममध्ये तीन एकर जमिनीवर टेंट सिटीची उभारण्यात आली आहे. या सिटीमध्ये 10 हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. याशिवाय मणि पवर्तजवळील बाग बिजेसी येथे 25 एकर जमिनीवरही टेंट सिटी उभारण्यात येत आहे. या ठिकाणी 15 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण टेंट सिटी पाच शहरांमध्ये विभागली गेली आहे. संपूर्ण टेंट सिटीमध्ये भोजनालय देखील उभारण्यात आले आहे. याशिवाय साधुसंतांना राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे.
राम मंदिरापासून 500 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मणिराम दास छावणी जवळील टेंट सिटीमध्ये 12 ते 15 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आणखी वाचा:
एकेकाळी दूध विक्री करायचे, आता वाढदिवशी घेणार CM पदाची शपथ
ALERT! सॅमसंगचा फोन वापरताय? सरकारने दिला महत्त्वाचा इशारा, धोका
VIDEO : संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक, प्रेक्षकांच्या गॅलरीतून अज्ञातांनी मारल्या उड्या