सार

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जोरजार तयारी सुरू आहे. अशातच राम मंदिरापर्यंत भाविकांना पोहोचण्यासाठी गुगलने एक खास व्यवस्था केली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी जगभरातून भाविक येण्याची शक्यता आहे. देशातील तीन हजारांहून अधिक व्हीव्हीआयपी (VVIP) लोकांना कार्यक्रमासाठी  आमंत्रण पाठवण्यात येत आहे.

तर गुगलकडून (Google) राम मंदिराच्या उद्घनावेळी खास व्यवस्था करण्यात आली आहे. खरंतर राम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅपवर (Google Map) सर्व रस्त्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. याआधी अयोध्येत गुगल मॅपवर वाहतुकीसंदर्भात सुविधा नव्हती. पण अयोध्येचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजकरन अय्यर यांच्या प्रयत्नाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

गुगल मॅप सांगणार मंदिराचा मार्ग
रामनगरी अयोध्येत पोहोचणाऱ्यांना गुगल मॅप मार्ग दाखवणार आहे. कोणत्याही भाविकाला गुगलवर दाखवण्यात आलेल्या मार्गावरून राम मंदिरापर्यंत पोहोचता येणार आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सोपा मार्ग गुगल मॅपला विचारला तरीही तो दाखवला जाणार आहे.

याशिवाय स्थानिक पोलीस स्थानक, पार्किंगची ठिकाणे यांचीही नावे गुगल मॅपवर दाखवली जाणार आहेत. राम मंदिरापर्यंत जाणारा नवा मार्गही गुगल मॅपमध्ये अपडेट करण्यात आला आहे.

विमानतळ होणार सुरू
22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच खुले करण्यात येणार आहे. तर दिल्ली ते अयोध्येसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरूवात केली जाऊ शकते.

दुसऱ्या बाजूला, अयोध्येत सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश आणि जगभरातून तीन हजार व्हीव्हीआयपी अयोध्येत येऊ शकतात. तसेच चार हजारांच्या आसपास साधुसंतही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा: 

AYODHYA RAM MANDIR : राम मंदिरासाठी या पुजाऱ्यांची झाली निवड

Ayodhya Ground Report : अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी उभारली Tent City, जाणून घ्या खास गोष्टी

Article 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 च्या निर्णयाचे केले स्वागत, म्हणाले…