सार

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी, 2024 रोजी पार पडणार आहे. याच दरम्यान, एशियानेट न्यूजची टीम अयोध्येत पोहोचली असता त्यांनी तेथील हॉटेलचे भाडे विचारले. जानेवारी महिन्यात बहुतांश हॉटेलचे बुकिंग झाल्याचे कळले.

Ayodhya : अयोध्येत येत्या 22 जानेवारी, 2024 रोजी रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. भाविकांसह साधुसंतांना राहण्यासाठी टेंट सिटी (Tent City) उभारण्यात आली आहे. पण अयोध्येत राहण्यासाठी हॉटेलचे भाडे विचारले असता त्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्याचे समोर आले आहे.

नया घाट (Naya Ghat) येथील रामप्रस्थ हॉटेलमध्ये 22 जानेवारीच्या आसपासच्या दिवसात सर्व रूम बुकिंग झाल्या आहेत. रघुनंदन नावाच्या व्यक्तीने हॉटेलमध्ये रूमचे भाडे विचारले असता तो किंमती ऐकून हैराण झाला. रघुनंदन याने सांगितले की, जानेवारी महिन्यात हॉटेलच्या रुमचे भाडे 25 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. या हॉटलमध्ये एका दिवसाचे भाडे 15 हजार रूपये असल्याचे रघुनंदन याला सांगितले गेले.

याशिवाय आलिशान हॉटेलचे एका दिवसाचे भाडे जे पाच हजार रूपये होते ते जानेवारी (2024) महिन्यात 50 हजारांपर्यंत पोहोचले आहे. तरी देखील बहुतांश हॉटेल्सचे बुकिंग झाल्याचे रघुनंदन याने म्हटले आहे.

महिन्याभरात दहापट वाढल्या हॉटेल रुमच्या किंमती

नॅशनल हायवे बूथ क्रमांक चार जवळील हॉटेल रामायणमधील रूमचे भाडे देखील खूप वाढले गेले आहे. हॉटेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर (2023) रोजी सुपीरियर रूमचे (Superior Room) एका दिवसाचे भाडे 7 हजार 726 रूपये आहे. पण जानेवारी महिन्यात याच रुमचे भाडे तब्बल 39 हजार 938 रूपये झाले आहे.

लग्झरी सूट रूमचे भाडे 76 हजारांपर्यंत पोहोचले आहे. स्थानिक लोक सांगतात की, यंदाच्या वर्षाच्या (2023) सुरूवातीच्या महिन्यात हॉटेलच्या रूमचे कमीत कमी पाच हजार ते 15 हजार रूपये भाडे होते. पण राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी हॉटेल मालकांनी रूमच्या भाड्यात वाढ केली आहे.

हॉटेलच्या वाढलेल्या किंमतीतही आगाऊ बुकिंग
एका हॉटेल मालकाने सांगितले की, जानेवारी महिन्यात हॉटेलचे बुकिंग सीझनच्या किंमतीनुसार करण्यात आली आहे. हॉटेलचे आगाऊ बुकिंग 25 हजारात करण्यात आल्याचेही हॉटेल मालकाने सांगितले. म्हणजेच अयोध्येत जानेवारी महिन्यात भाविकांना हॉटेलच्या रूम बुकिंग करणे मुश्किलच आहे.

Holy Ayodhya Appच्या माध्यमातून होमस्टेसाठी बुकिंग
पर्यटन अधिकारी आरपी यादव म्हणतात की, अयोध्येत 170-175 हॉटेल, 72 गेस्ट हाउस आणि 50 च्या आसपास धर्मशाळा आहेत. भाविकांना राहाण्यासाठी 400 हून अधिक होमस्टेची व्यवस्था करण्यात आली आहे. होली अयोध्या अ‍ॅपच्या (Holy Ayodhya App) माध्यमातून कोणताही व्यक्ती होमस्टेसाठी बुकिंग करू शकतो हे देखील यादव यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा: 

Ram Mandir Ceremony : भाविकांना लवकरच रामललांचे करता येणार दर्शन, पण या गोष्टींचे करावे लागणार पालन

Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांना Google रामनगरीत पोहोचवण्याचे करणार काम

AYODHYA RAM MANDIR : राम मंदिरासाठी या पुजाऱ्यांची झाली निवड