Rajkot Gaming Zone Blast : जळालेल्या मृतदेहांची ओळख पटली नाही, डीएनए नमुने गोळा करून पाठवले जामनगर लॅबमध्ये

| Published : May 26 2024, 01:19 PM IST

राजकोट गेमिंग स्फोट मृतदेह
Rajkot Gaming Zone Blast : जळालेल्या मृतदेहांची ओळख पटली नाही, डीएनए नमुने गोळा करून पाठवले जामनगर लॅबमध्ये
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये झालेल्या अपघातात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काही मृतदेहांची ओळख पटलेली नसून त्यांचे डीएनए राजकोट येथील लॅबमध्ये पाठवून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

गुजरातमधील राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 12 हून अधिक मुलांचाही समावेश आहे. प्रशासनाकडून सध्या डेब्रिज हटवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे. अशा परिस्थितीत सध्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आह. अशा स्थितीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटावी यासाठी आता डीएनए जमा करण्यात येत आहेत. 

लहान मुलांच्या किंचाळ्यांनी आजूबाजूचे लोक गेले घाबरून - 
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. बरेच लोक गेमिंग झोनच्या बाहेर पळाले पण मोठ्या संख्येने लोक तिथे अडकले. भडकलेल्या ज्वाळांमध्ये लहान मुलांचे आणि लोकांच्या किंकाळ्या स्थानिक लोकांच्या मनातून निघू शकल्या नाहीत.

नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेतले
एसीपी विनायक यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटू शकली नाही. आम्ही मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा केले आहेत आणि ज्या नातेवाईकांनी त्यांच्यावर दावा केला आहे, त्यांना आपल्या नातेवाईकांचे मृतदेह हवे आहेत. या सर्वांचे नमुने चाचणीसाठी विमानाने जामनगरच्या प्रयोगशाळेत नेण्यात आला आहे. डीएनए नमुने तपासल्यानंतर आणि मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते मृतांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. 

गेमिंग झोनचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमिंग झोनचा मालक आणि व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नाना-मावा रोडवरील घटनास्थळी आणि जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयात भेट दिली. त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यास सांगितले. त्यांनी जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आणखी वाचा - 
मुंबई-आग्रा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर पडला दरोडा, व्हिडीओ पाहून आपण घालाल तोंडात बोटे
सोशल मीडियावरील केदारनाथचा Viral Video पाहिलात का, पाहून म्हणाल येथे तर...