मुंबई-आग्रा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर पडला दरोडा, व्हिडीओ पाहून आपण घालाल तोंडात बोटे

| Published : May 26 2024, 12:23 PM IST

चोरी करतानाच व्हिडीओ
मुंबई-आग्रा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर पडला दरोडा, व्हिडीओ पाहून आपण घालाल तोंडात बोटे
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मुंबई गोवा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर दरोडा टाकण्यात आला. ट्रकच्या मागून येणाऱ्या गाडीतल्या ड्रायव्हरने याचा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये आहे. 

सध्याच्या काळात चित्रपटाप्रमाणे चोरी केल्या जात असून याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चोरी करताना आधुनिक पद्धतीचा वापर करून चोरी करता येते, हेच यामधून दिसून येत असते. मुंबई आग्रा महामार्गावरून एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला असून तो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये चोर चोरी करत असून त्यांच्या चोरीचा संशय ड्रायव्हरवर गेला आहे. 

मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिडीओ झाला व्हायरल - 
मुंबई गोवा महामार्गावरील हा व्हिडीओ दिसून येत असून यामध्ये चोर धूम चित्रपटाप्रमाणे चोरी करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये एक ट्रक महामार्गावरून जात असताना चोरी झालेली दिसून आली आहे. दोन जण ट्रकच्या छतावर गेले असून एकजण त्यांच्या मागे गाडी चालवत असल्याचे दिसून येत आहे. तो या दोघांना गाडीवर बसवून घ्यायला आलेला असतो. 

सुरुवातीला ट्रॅकवर असणारे दोघे एक बॉक्स खाली फेकतात. त्या बॉक्समधून आजूबाजूला काहीतरी पडल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर एका गाडीवर चोरांचा सोबती गादीवर येत असतो. मग चोर हळूहळू ट्र्कवरून खाली येतात, तो सुरुवातीला आलेला व्यक्ती उडी मारून गाडीवर बसतो आणि दुसऱ्याला वरून खाली घ्यायला मदत करतो. दुसरा व्यक्ती गाडीवर बसल्यानंतर ते मागे जाताना दिसून आले आहे. या व्हिडिओवर लोकांच्या कमेंट आल्या असून त्यामध्ये अनेक जणांनी यामद्ये ड्रायव्हरचा समावेश असल्याचा दावा केला आहे. तर काही लोकांनी चोरी होत असल्याचा व्हिडीओ काढण्यापेक्षा ट्रक ड्रायव्हरला सांगायला हवं होते अशीही प्रतिक्रिया दिली आहे. 
आणखी वाचा - 
Delhi Fire : दिल्लीतील चिल्ड्रेन हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 6 बालकांचा मृत्यू, अनेक जखमी झाल्याचा अंदाज
PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानचा या तारखेला जमा होणार 17 वा हप्ता